तैवानमधील वृद्धाने रंगविले संपूर्ण गाव; पाडण्यापासून वाचविली सर्व घरे

    04-May-2026
Total Views |
 
 

taiwan 
तैवानचे रेनबाे व्हिलेज प्रसिद्ध पर्यटन स्थळ ठरत आहे; पण एक काळ असा हाेता, जेव्हा या संपूर्ण गावाला रीडेव्हलपमेंटसाठी पाडण्यात येणार हाेते.चीन सरकारने या गावाला पाडण्याचा आदेश दिला हाेता. त्यानंतर 96 वर्षांचे वृद्ध हुआंग युंग-फूनी संपूर्ण गावातील भिंतींवर पेंटिंग काढली. आज या संपूर्ण गावात हजाराे चित्रे आहेत. त्यासाठी त्याला रेनबाे व्हिलेज म्हटले जाते. हे गाव प्रसिद्ध झाले आहे आणि दर वर्षी इथे 10 लाखांपेक्षा जास्त लाेक फिरायला येतात.
 
 कंटाळा दूर करण्यासाठी सुरू केले पेंटिंग हुआंग सैनिक हाेते; पण गावातील लाेक त्यांना ग्रँडपा रेनबाे म्हणून संबाेधतात.आजपासून अनेक वर्षांपूर्वी जेव्हा चीन सरकारने 1200 घरे असणाऱ्या या गावाला पाडण्याचा आदेश दिला तेव्हा गावातील बहुतेक लाेकांनी ते साेडले; पण हुआंग तिथेच ठामपणे राहिले.त्यांच्या व्यतिर्नित तिथे केवळ 11 कुटुंबे आणखी हाेती. आपला कंटाळा घालविण्यासाठी एक दिवस त्यांनी पेंट ब्रश हातात घेऊन आपली खाेली रंगविली आणि मग ते कधी थांबले नाहीत.आपले घर पेंट केल्यानंतर ते दुसऱ्यांची घरे, गावातील रस्ते आणि भिंतीही रंगवू लागले. हुआंग यांच्या पेंटिंगमध्ये जंगली-पाळीव प्राण्यांपासून मुलांची कार्टून कॅरे्नटर, पक्षी, पांडा,
 
 समुराईपर्यंतची चित्रे दिसतात : मग नंतर मिळाली 80 हजार लाेकांची साथ यानंतर स्थानिक युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी हुआंग यांचे काम शाेधले आणि गाव वाचविण्यासाठी माेहीम सुरू केली. 80 हजार लाेकांनी याचिका दाखल करून युंग यांच्या मेहनतीची गाेष्ट सरकारपर्यंत पाेहाेचविली.त्यामुळे सरकारवर दबाव वाढला आणि सरकारने मान्य केले की, या गावाला पाडण्याऐवजी गावाला संरक्षण दिले पाहिजे.