वृश्चिक

    04-May-2026
Total Views |
 
 

horoscope 
हा आठवडा तुमच्यासाठी आत्मशक्ती व निर्णयक्षमता मजबूत करणारा राहील.तुम्ही तुमच कामांमध्ये खाेलवर विचार करीत पुढे जाल. ज्यामुळे यश मिळण्याचे याेग जुळून येतील. कार्यक्षेत्रात काही आव्हाने समाेर येतील पण तुमची दृढशक्ती तुम्हाला पुढे नेईल. आर्थिक स्थिती सुधारण्याचे संकेत मिळत आहेत.
 
 नाेकरी-व्यवसाय : हा आठवडा करियर व व्यवसायासाठी मेहनत व रणनीती ठरवण्याचा राहील. कार्यस्थळावर काही कठीण परिस्थितींचाही सामना करावा लागू शकताे. पण तुम्ही हुशारीने व धैर्याने पुढे जाल. व्यापार करणाऱ्यांसाठी या आठवड्यात विचारपूर्वक गुंतवणूक करायला हवी.
 
 नातीगाेती : या आठवड्यात दांपत्य जीवनात विश्वास आणि सामंजस्य वाढेल. अविवाहित जातकांना मनाजाेगे स्थळ चालून येण्याची श्नयता आहे.कुटुंबासाेबत वेळ घालवल्यामुळे तुम्हाला मानसिक शांती व समाधान लाभेल.तुम्ही नात्यांमध्ये संशय आणि भ्रम यांना थारा देऊ नये.
 
 आराेग्य : या आठवड्यात आराेग्य सामान्य राहील पण कामाचा व्याप तणावाची स्थिती निर्माण करू शकताे. याशिवाय तुम्हाला रक्त आणि पाेटासंबंधित समस्या हाेऊ शकतात. यासाठी खाण्या-पिण्यावर ताबा ठेवावा व बाहेरचे खाणे टाळावे. तसेच याेग व स्ट्रेचिंग फायदेशीर ठरेल.
 
 शुभदिनांक : 04, 08, 09
 
 शुभरंग : लाल, पिवळा, क्रीम
 
 शुभवार : रविवार, साेमवार, मंगळवार
 
 दक्षता : या आठवड्यात अतिरेकी संशय व घाईत निर्णय घेणे टाळावे.
 
 उपाय : मंगळवारी श्रीहनुमंताला शेंदूर व चमेलीचे तेल अर्पण करावे व ॐ हनुमते नम: चा 108 वेळा जप करावा. गरजूंना जेवण द्यावे.