नांदेड विमानतळ विकासासाठीचा प्रस्ताव तात्काळ सादर करा : सावे

    04-May-2026
Total Views |
 
 
 

save 
नांदेड विमानतळ अधिक सुसज्ज करण्यासाठी धावपट्टी विस्तार, अतिरिक्त सुविधा व सेवा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागांनी तात्काळ सर्वेक्षण करून शासनाकडे प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देश aपालकमंत्री अतुल सावे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात विमानतळ विकास कामांबाबत आयाेजित आढावा बैठकीत सावे बाेलत हाेते.यावेळी खासदार अशाेक चव्हाण, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, महापालिका आयुक्त डाॅ. महेशकुमार डाेईफाेडे, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, उपविभागीय अधिकारी डाॅ. सचिन खल्लाळ, विमानतळ संचालक अमरदीप सिंग सेहरा, संचालक व्यवस्थापक निलेश साेनटक्के आदी अधिकारी उपस्थित हाेते. सध्या नांदेड येथून सात ठिकाणी विमानसेवा सुरू असून, लवकरच ती दहा ठिकाणी वाढवण्याचे नियाेजन आहे. वाढत्या विमान वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर एकाच वेळी दाेन ते तीन विमाने उतरल्यास अडचणी निर्माण हाेऊ शकतात.