हा आठवडा तुमच्यासाठी नवी दिशा व सकारात्मक ऊर्जा घेऊन येईल.तुमचे प्रयत्न व प्रारब्ध दाेघांची उत्तम साथ मिळेल. ज्यामुळे कामात प्रगती हाेईल.कार्यक्षेत्रात तुमची प्रतिमा मजबूत हाेईल व नव्या जबाबदाऱ्या मिळतील. पण तुम्ही दृढ इच्छाशक्तीच्या बळावर पुढे जाल. आर्थिक स्थिती सुधारेल.
नाेकरी-व्यवसाय : या आठवड्याची सुरुवात अनुकूल राहील. नाेकरदार जातकांना नवे प्राेजे्नट मिळू शकतात व त्यांच्या कामाची प्रशंसा हाेईल. बढती वा बदलीचे याेग हाेताना दिसत आहेत. व्यापाऱ्यांसाठी नव्या संधी मिळतील व गुंतवणुकीतून फायदा हाेईल. शिक्षण, प्रवास इ. क्षेत्रातील व्यक्तींना विशेष लाभ.
नातीगाेती : या आठवड्यात दांपत्य जीवनात प्रेम व सामंजस्य टिकून राहील.कुटुंबात एखादा मंगलसाेहळा हाेण्याची श्नयता आहे. अविवाहित मंडळींसाठी विवाहाचे प्रस्ताव येण्याची श्नयता दिसून येत आहे. जाेडीदारासाेबत दूरचा प्रवास घडू शकताे. मुलांकडून यशाची बातमी कळल्यामुळे आनंद लाभेल.
आराेग्य : या आठवड्यात तुमचे आराेग्य चांगले राहील पण अधिक धावपळीमुळे थकवा जाणवू शकताे. मांडी वा कंबरेसंबंधित समस्या असणाऱ्यांनी सावध राहावे.अधिक साहस वा जाेखमीच्या कामांपासून स्वत:ला दूर ठेवावे. नियमित व्यायाम करावा व संतुलित आहार घ्यावा.
शुभदिनांक : 04, 08, 09
शुभरंग : लाल, पिवळा, क्रीम
शुभवार : रविवार, साेमवार, मंगळवार
दक्षता : या आठवड्यात अतिआत्मविश्वासाने जाेखमीचे निर्णय घेऊ नयेत.
उपाय : श्रीविष्णूचे गुरुवारी पूजन करावे व पिवळे फूल अर्पण करावे तसेच ॐ नमाे भगवते वासुदेवाय चा 108 जप करावा.