आजकाल लग्ने ही साेशल मीडियावर पाेस्ट हाेणारी, सर्वांत जास्त लाईक्स मिळवून देणारी ट्रेंडिंग इव्हेंट बनली आहेत. याविषयी मॅक्स इव्हेंट्स आणि वेडिंग्सच्या मिमल जाेशी यांनी सांगितले की, आजकालच्या लग्नाला आम्ही ‘इन्स्टा वेडिंग’ म्हणताे. कारण यामध्ये डेकाेरेशन, थीम, कपडे, कलर-काॅम्बिनेशन, अस्थेटिक्स एकदम सुदंर असणे आवश्यक आहे. इव्हेंट एकदम इन्स्टा हाेण्यासाठी सध्या काय ट्रेण्डिंग आहे, याची माहिती एकत्र करताे. त्यात नवीन काय करता येईल, याचा विचार हाेताे.डेस्टिनेशन वेडिंग मागील दहा वर्षांपासून डेस्टिनेशन वेडिंगचे वेड लाेकांना लागले आहे. त्यासाठी जयपूर, उदयपूर, बंगळुरु, काेची, नवसारी, वापी आणि सिल्वासा यांसारखी ठिकाणे या सीझनमध्ये चालतील, असे सांगून मिमल जाेशी म्हणाल्या, आता राजेशाही लग्नासाठी राजस्थान, बीच-वेडिंगसाठी गाेवा, व्हाईट वेडिंगसाठी लाेक काश्मीर, मनालीला जातात. काही जण बँकाॅक, दुबई, थायलंडला जातात.
थायलंड तर भारतापेक्षाही स्वस्त पडते. इंटरनॅशनल वेडिंगचा टच वेगळाच असताे! वधू-वराची इच्छा महत्त्वाची सध्या वधू-वराच्या इच्छेप्रमाणे सगळं हाेते, असे सांगून मिमल जाेशी म्हणतात, पूर्वी लग्न समारंभातील सगळ्या बाबी ज्येष्ठ व्यक्ती ठरवायचे. हल्ली फक्त वधू-वर प्लॅनरला काय पाहिजे ते सांगतात. त्यासाठी ते दाेघेही रिसर्च करतात.पालकांनाही वाटते की, मुलांच्या मर्जीनुसारच सगळं व्हावं.तेही आनंदाने सहभागी हाेतात.हळदीचा कार्यक्रम झाला जांभळा हल्ली हळदीच्या कार्यक्रमात पिवळ्या रंगाचे डेकाेरेशन अनेकांना आवडत नाही. त्यासाठी जांभळा रंग लाेकप्रियहाेत आहे. हळदी ऐवजी फुलांची किंवा रंगांची हाेळी खेळण्यास सुरुवात झाली आहे. मिमल जाेशी म्हणाल्या, हल्ली हळदीचा कार्यक्रम माेरक्कम थीमवर किंवा राेमन थीमवर करण्याची मागणी वाढली आहे.विविध खेळ असलेले कार्निवल लग्ना समारंभात विविध खेळ असलेल्या कार्निवलचेआयाेजन हाेते.
यामध्ये ब्लाॅक प्रिंटिंग, लाेगाे डिझाईनिंग सारखे कार्यक्रम हाेतात. याविषयी इन्फायनाईट एन्टटेन्मेंटचे मेहुल नायक यांनी सांगितले की, जत्रा, कॅसिनाे, शेअर- बाजार आदी थीमवरही कार्निवल सेट-अप केला जाताे.लाेकांना मजा येईल अशा पद्धतीने खेळ आयाेजिले जातात.जत्रेच्या थीममध्ये विविध स्टाॅल्स, राईड, ज्याेतिष, रिंगच्या गेम्स आदी असतात.पाहुणेही कार्यक्रमात सहभागी हाेतात लग्नाला आलेले पाहुणे सगळे कार्यक्रम पाहायचे. पण, आता तेही विविध मनाेरंजनाच्या कार्यक्रमांत सहभागी हाेतात. याविषयी सेव्हन शेड्स इव्हेंट्सचे आदित्य धुम्मा यांनी सांगितले, की सध्या लग्न समारंभात ड्रम सर्कल सारखे कार्यक्रम हाेतात. ज्यामध्ये प्रत्येक व्यक्ती ड्रम-प्लेयरकडून शिकून ड्रम वाजवताे. या सामूहिक वादनात लाेकांना फारच आनंद मिळताे.
ड्राेन शाे आणि राॅबाेट सध्या लग्नामध्ये ड्राेन शाेची खूप चर्चा आहे. यासाठी पैशाबराेबर पाेलिसांची परवानगीही लागते. याविषयी आदित्य धुम्मा यांनी सांगितले की, ड्राेन शाे माध्यमातून वधू-वरांची लव्ह-स्टाेरी दाखविल्यावर लाेकांना खूप आवडते. याशिवाय टेक्नाॅलाॅजीचा भरपूर वापर लग्न समारंभामध्ये हाेऊ लागला आहे. जसे की, सर्व्हिस देण्यासाठी फिरणारे राेबाेट. ते आयाेजकांच्या वतीने पाहुण्यांचे स्वागतही करतात.लग्नात गंगा आरती आदित्य धुम्मा यांनी सांगितले की, बऱ्याच लाेकांना गंगा आरतीचे आकर्षण असते. यासाठी लग्न समारंभात पाण्याचा एक डाेह तयार केला जाताे.ऋषिकेशहून आलेले पंडित गंगेच्या आरतीप्रमाणे आरती करतात. लाेकांना जणूकाही गंगा समाेरच असल्यासारखे वाटते. यामुळे एक वेगळेच वातावरण निर्माण हाेते. लाेकांना हे फारच आवडल्याने त्याची मागणीही वाढली आहे.