हा आठवडा तुमच्यासाठी संतुलन, सामंजस्य व याेग्य निर्णय घेण्याचा काळ राहणार आहे. तुम्ही तुमच कामांमध्ये संतुलन टिकवून ठेवाल. ज्यामुळे यशाचे मार्ग माेकळे हाेतील. कार्यक्षेत्रात तुमची प्रतिमा मजबूत हाेईल व लाेक तुमच्या सल्ल्याला महत्त्व देतील. कुटुंबात सुख-शांती टिकून राहील.
नाेकरी-व्यवसाय : या आठवड्याच्या सुरुवातीला काही कामांना उशीर हाेण्याची श्नयता आहे. पण मध्यानंतर स्थिती अनुकूल हाेत जाईल. नाेकरदारांनी आपल्या कामात धैर्य राखायला हवे. वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल. व्यापाऱ्यांना नव्या संधी लाभतील व भागीदारीत फायदा हाेईल.
नातीगाेती : या आठवड्यात कुटुंबात शांततेचे आणि जिव्हाळ्याचे वातावरण राहणार आहे. जीवनाचा जाेडीदार शाेधत असलेल्या विवाहेच्छुकांना यश मिळण्याची श्नयता आहे. कुटुंबासाेबत तुम्ही आनंदात वेळ घालवाल. त्यांच्यासाेबत एखाद्या लग्नसमारंभानिमित्त प्रवासही घडण्याची श्नयता आहे.
आराेग्य : आराेग्याच्या दृष्टीने आठवडा सामान्य असेल पण तुम्ही तुमच्या मानसिक आराेग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. मानसिक तणाव व थकव्यापासून जपावे. ध्यानधारणा, याेग व प्राणायामाने तुम्ही तुमचे मानसिक आराेग्य उत्तम राखू शकता. त्वचा व किडनीसंबंधित समस्या असणाऱ्यांनी सावध राहावे.
शुभदिनांक : 03, 06, 07
शुभरंग : हिरवा, क्रीम, गुलाबी
शुभवार : बुधवार, शुक्रवार, शनिवार
दक्षता : या आठवड्यात निर्णय घेण्यास वेळ लावू नये व इतरांवर जास्त अवलंबून राहू नये.
उपाय : शुक्रवारी लक्ष्मीमातेची पूजा करावी व सुगंधी फुले अर्पण करावी आणि ॐ श्रीं महालक्ष्म्यैं नम: चा 108 वेळा जप करावा.