हा आठवडा तुमच्यासाठी आत्मविश्वास आणि प्रभावात वाढीचे संकेत देत आहे. तुम्ही तुमच्या कामांत नेतृत्व दाखवाल व लाेक तुमच्या निर्णयाची स्तुती करतील. कार्यक्षेत्रात नव्या जबाबदाऱ्या मिळू शकतात. ज्या तुम्ही यशस्वीपणे पार पाडाल. आर्थिक स्थितीत सुधारणा हाेईल.
नाेकरी-व्यवसाय : या आठवड्याच्या सुरुवातीलाच तुमच्या कामाला वेग येईल. नाेकरदार जातकांना त्यांच्या कामात यश व प्रशंसा मिळू शकते.बढतीच्या संधी जुळून येतील. व्यापाऱ्यांसाठी नव्या संधी चालून येतील तसेच जुन्या कामांमधून फायदा हाेईल. शासकीय, व्यवस्थापन व नेतृत्वासंबंधितांना विशेष यश मिळेल.
नातीगाेती : या आठवड्यात तुमच्या दांपत्य जीवनात प्रेम व सामंजस्य वाढेल. घरासंबंधित कामे पूर्ण करण्यात व घरातील व्यक्तींमध्ये सुखद ताळमेळ राखण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. ज्यामुळे तुमचे मन उत्साही राहील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल व मित्रांचे सहकार्य लाभेल.
आराेग्य : या आठवड्यात तुमचे आराेग्य सशक्त व उत्तम राखण्याची संधी मिळेल. तुम्हाला हृदय वा रक्तदाबासंबंधित काही समस्या असेल वा काही त्रास असेल तर तुम्ही सावध राहायला हवे. नियमितपणे तपासणी करावी तसेच नियमित व्यायाम करावा व समताेल आहार घ्यावा.
शुभदिनांक : 04, 08, 09
शुभरंग : लाल, पिवळा, क्रीम
शुभवार : रविवार, साेमवार, मंगळवार
दक्षता : या आठवड्यात अहंकार टाळा व इतरांचा सल्ला डावलू नका.
उपाय : रविवारी सूर्यदेवाला अर्घ्य द्या व ॐ घृणि सूर्याय नम: मंत्राचा 108 वेळा जप करा.