मीन

    04-May-2026
Total Views |
 

horoscope 
हा आठवडा तुम्हाला आध्यात्मिक प्रगती व मानसिक शांतीचा संकेत देत आहे. तुम्ही तुमची कामे धैर्यान व हुशारीने पूर्ण कराल. ज्यामुळे सकारात्मक परिणाम मिळतील. कार्यक्षेत्रात तुमच्या श्रमाचे चीज होईल व नव्या संधी मिळतील. आर्थिक स्थिती सुधारेल पण खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
 
■ नोकरी-व्यवसाय या आठवड्याची सुरुवात अनुकूल राहील. नोकरदार जातकांना नव्या संधी मिळू शकतात. तसेच त्यांनी केलेल्या कामाची प्रशंसा होईल. बढतीचे योगही जुळून येत आहेत. व्यापाऱ्यांना नव्या गुंतवणुकीतून फायदा होईल. कला संगीत व आध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तींना विशेष लाभ होईल.
 
■ नातीगोती : या आठवड्यात दांपत्य जीवनात प्रेम व सामंजस्य वाढेल. अविवाहित जातकांसाठी नव्या नात्याची सुरुवात होण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मानसिक शांती लाभेल. नात्यांमधील भावनिक संबंध मजबूत होतील. मुलांकडून सुखद समाचार मिळेल.
 
■ आरोग्य : या आठवड्यात तुमचे आरोग्य सामान्य राहील. पण मानसिक तणाव आणि थकवा जाणवण्याची शक्यता आहे. झोप आणि पायांसंबंधित समस्या होण्याची शक्यता आहे. योग व ध्यान धारणा तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. त्याप्रमाणेच उन्हापासून तुम्ही जपायला हवे.
 
■ शुभदिनांक : ०४,०८,०९
 
■ शुभरंग लाल, पिवळा, क्रीम
 
■ शुभवार रविवार, सोमवार, मंगळवार :
  
■ दक्षता या आठवड्यात कोणतेही काम घाईगडबडीत करू नये.
 
उपाय : या आठवड्यात रोज श्रीविष्णूची पूजा करीत पिवळे फूल अर्पण करावे व ॐ नमो भगवते वासुदेवाय चा १०८ जप करावा.