बाल वारकऱ्यांनी केलेल्या ‘ज्ञानदेव तुकाराम’ गजराच्या सुरांनी महाराष्ट्र लाेकभवनाचा परिसर दुमदुमला. राज्यपाल जिष्णू देव वर्मा व त्यांच्या पत्नी सुधा देव वर्मा यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य स्थापना दिवस साजरा करण्यात आला, त्यावेळी राज्यपालांचे स्वागत बाल वारकऱ्यांच्या दिंडीने व नामगजरात करण्यात आले.‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमांतर्गत महाराष्ट्र व गुजरात राज्य स्थापना दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. यावर्षी पद्म पुरस्काराने सन्मानित झालेल्या मान्यवरांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अमरवाणी फाउंडेशन या संस्थेच्या सहकार्याने आयाेजित सांस्कृतिक कार्यक्रमात गायक शंतनू हेर्ले कर, गायिका उपग्ना पंड्या व कलाकार अभिमन्यू हेर्लेकर यांनी सुंदर मराठी व गुजराती लाेकगीते व भक्तिगीते सादर केल्याबद्दल राज्यपालांनी त्यांचे भरभरून काैतुक केले.सांस्कृतिक कार्यक्रमात ‘सूर निरागस हाे’, गुजराती लाेकगीत, ‘वैष्णव जन ताेफ व तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ हा अभंग सादर करण्यात आला. बाल वारकऱ्यांनी सादर केलेल्या पारंपरिक नृत्याने उपस्थितांचे मन जिंकले. यावेळी राज्यपालांच्या पुढाकाराने ‘टीबी मुक्त भारत’ अभियानाची सुरुवात करण्यात आली