हा आठवडा तुमच्यासाठी नव्या श्नयता आणि सकारात्मक बदलाचा काळ आहे. तुमच्या विचारात व कामात नावीन्य येईल. ज्यामुळे तुम्हाला पुढे जाण्याची संधी मिळेल. कार्यक्षेत्रात तुमच्या प्रतिभेची स्तुती केली जाईल. आर्थिक स्थिती सुधारण्याचे संकेत आहेत पण खर्चावर ताबा ठेवावा.
नाेकरी-व्यवसाय : या आठवड्याच्या सुरुवातीला काही नवी कामे समाेर येऊ शकतात. नाेकरदारांना आपल्या कामात रचनात्मकता दाखवण्याची संधी मिळेल. वरिष्ठांकडून प्रशंसा हाेईल. व्यापाऱ्यांना नव्या संपर्कातून फायदा हाेईल व विस्ताराची संधी मिळेल.
नातीगाेती : या आठवड्यात तुमच्या दांपत्य जीवनात प्रेम व समजूतदारपणा वाढेल. अविवाहित जातकांसाठी नव्या नात्याची सुरुवात हाेण्याची श्नयता दिसून येत आहे. कुटुंब आणि मित्रासाेबत वेळ घालवल्यामुळे मन प्रसन्न राहील.नात्यांमध्ये माेकळेपणा राखावा.
आराेग्य : या आठवड्यात तुमचे आराेग्य उत्तम राहील. पण तुम्ही मानसिक तणाव व जादा विचार करणे टाळायला हवे.. नियमित दिनचर्या अवलंबावी आणि पुरेशी झाेप घ्यावी. त्वचेचे वा शिरांसंबंधित समस्या असल्यास तुम्ही सावध राहायला हवे व उन्हापासून जपायला हवे.
शुभदिनांक : 03, 06, 07
शुभरंग : हिरवा, क्रीम, गुलाबी
शुभवार : बुधवार, शुक्रवार, शनिवार
दक्षता : या आठवड्यात विचार न करता काेणताही निर्णय घेऊ नये व इतरांच्या बाेलण्याने गाेंधळून जाऊ नये.
उपाय : बुधवारी श्रीगणेशाला दूर्वा अर्पण करून ॐ गं गणपतये नम: मंत्राचा 108 वेळा जप करावा.