विकसित भारतासाठी नारीश्नतीचा सहभाग महत्त्वाचा : मुख्यमंत्री

    04-May-2026
Total Views |
 
 

CM 
 
 
विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी नारीशक्तीचा सहभाग महत्त्वाचा आहे.देशाच्या विकास वाटचालीत नारीशक्तीचे याेगदान महत्त्वाचे असून, ही नारीशक्ती ज्यावेळी संसाधन म्हणून देशाच्या अर्थव्यवस्थेत सहभागी हाेईल, तेव्हाच भारत पूर्णपणे विकसित हाेईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. देशात सर्वात पहिल्या एक काेटी लखपती दीदी महाराष्ट्रातच झाल्या पाहिजेत, असे आवाहनही त्यांनी केले.बांद्रा-कुर्ला काॅम्प्लेक्स संकुलातील एमएमआरडीए मैदानावर आयाेजित महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री बाेलत हाेते.यावेळी ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गाेरे, काैशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लाेढा, ग्राम विकास राज्यमंत्री याेगेश कदम, ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, राष्ट्रीय ग्रामीण जीवनाेन्नतीअभियानचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर, मुख्य परिचलन अधिकारी ओसवाल आदी मान्यवर उपस्थित हाेते.
 
देशात ई- काॅमर्स माेठ्या वेगाने वाढत आहे. उमेद मार्ट या डिजिटल प्लॅटफाॅर्मच्या माध्यमातून महिला बचत गटांच्या उत्पादनांना ऑनलाइन बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात आली आहे. या ऑनलाईन प्लॅटफाॅर्मवर 1000 पेक्षा जास्त वस्तू आहेत.राज्यातील नागरिकांनी उमेद मार्ट या ऑनलाइन प्लॅटफाॅर्मवरूनच खरेदी करावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.महिलांच्या उत्पादित मालाला हक्काची बाजारपेठ महालक्ष्मी सरसमधून मिळाली आहे. महिला बचत गटांच्या उत्पादित वस्तूंचे देशातील हे सर्वांत माेठे प्रदर्शन आहे. राज्यात बचत गटांच्या माध्यमातून ‘उमेद’ 39558 गाव खेड्यांत पाेहाेचले आहे, असे गाेरे यांनी सांगितले.उद्घाटनानंतर मान्यवरांनी प्रदर्शनातील स्टाॅलला भेट देत काही स्टाॅलधारकांशी संवाद साधला. कार्यक्रमादरम्यान उमेदच्या माध्यमातून 68 यशकथांवर आधारित पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच, उमेद मार्ट या ऑनलाइन प्लॅटफाॅर्मवर 1000 वस्तू सूचीबद्ध करण्यात आल्या.