वाच्यार्थ : पुरुषांमध्ये न्हावी, पक्ष्यांमध्ये कावळा, चतुष्पादांमध्ये (चार पायांचे प्राणी) काेल्हा आणि स्त्रीजातीमध्ये माळीण सर्वांत धूर्त समजली जाते.
भावार्थ : पुरुष, पक्षी, प्राणी, स्त्रियांमध्ये धूर्त काेण ते इथे चाणक्यांनी सांगितले आहे.
1. न्हावी - केशकर्तनाचा व्यवसाय करणारा न्हावी हा त्याच्या व्यवसायामुळे बहुश्रुत बनताे. समाजातील सर्व स्तरावरील लाेकांशी (राव आणि रंक), वेगवेगळ्या स्वभावाच्या, व्यवयायाच्या लाेकांशी त्याचे काम करता-करता बाेलणे सुरूच असते.त्यामुळे ताे बहुश्रुत बनून हुशार तर बनताेच; पण चलाख व धूर्तही बनताे.
2. कावळा - कावळ्याची नजर अत्यंत तीक्ष्ण असते.त्याचे सगळीकडे बारीक लक्ष असते. काही नजरेला पडताच ताे झेप घेऊन वस्तू उचलून नेताे किंवा टाेचा मारून जाताे.