मकर

    04-May-2026
Total Views |
 


horoscope
 
हा आठवडा तुमच्यासाठी धैर्य, शिस्त व प्रयत्नांचे सातत्य याद्वारे यश मिळवून देणारा असणार आहे. तुम्ही तुमची कामे गांभीर्याने पूर्ण कराल.कार्यक्षेत्रात जबाबदाऱ्या वाढू शकतात पण तुम्ही त्या कुशलतेने पार पाडाल.आर्थिक स्थिती स्थिर राहील पण बचतीकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
 
 नाेकरी-व्यवसाय : या आठवड्याच्या सुरुवातीला कामाचे दडपण अधिक राहू शकते, पण तुमच्या परिश्रमाचे चीज हाेईल. नाेकरदारांनी आपल्या लक्ष्यावर फाेकस राखायला हवा. वरिष्ठांकडून सहयाेग मिळेल.व्यापाऱ्यांना जुन्या गुंतवणुकीतून फायदा हाेईल. नव्या संधी मिळतील.
 
 नातीगाेती : या आठवड्यात तुमच्या दांपत्यजीवनात समजूतदारपणा व सहयाेगाची भावना राहणार आहे. अविवाहित मंडळींना उत्तम प्रस्ताव येण्याची श्नयता आहे. कुटुुंबासाेबत वेळ घालवल्यामुळे मानसिक संतुलन टिकून राहील. मुलांकडून सुखद समाचार कळू शकताे.
 
 आराेग्य : या आठवड्यात तुमचे आराेग्य सामान्य राहील पण हाडांसंबंधित व सांध्यांच्या समस्या हाेण्याची श्नयता आहे. तुम्ही नियमितपणे व्यायाम करायला हवा व संतुलित आहार घ्यायला हवा. कामाच्या अधिक व्यापामुळे थकवा राहू शकताे त्यामुळे पुरेसा आराम करणेही आवश्यक आहे.
 
 शुभदिनांक : 03, 06, 07
 
 शुभरंग : हिरवा, क्रीम, गुलाबी
 
 शुभवार : बुधवार, शुक्रवार, शनिवार
 
 दक्षता : या आठवड्यात अतिरेकी कामापायी आराेग्याकडे दुर्लक्ष करू नये.
 
 उपाय : शनिवारी शनिदेवाची पूजा करावी. तीळाचे तेल अर्पण करावे व ॐ शं शनैश्चराय नम: चा 108 वेळा जप करावा.