या आठवड्यात तुमच्यासाठी भावनिक संतुलन व नव्या दिशेचा संकेत मिळत आहे. तुम्ही तुमची कामे जबाबदारीने व हुशारीने पार पाडाल. ज्यामुळे उत्तम परिणाम मिळतील. कार्यक्षेत्रात नवी आव्हाने समोर येऊ शकतात पण तुम्ही ती धैर्याने सांभाळाल. आर्थिक स्थितीत सुधारण्याचे संकेत आहेत.
■ नोकरी-व - व्यवसाय या आठवड्याची सुरुवात सामान्य राहील. पण मध्यात कामाला वेग येईल. नोकरदार जातकांनी आपल्या कामामध्ये एकाग्रता टिकवून ठेवायला हवी. त्यांना वरिष्ठांचे सहकार्यही लाभेल. व्यापाऱ्यांना जुन्या संपर्कातून फायदा होईल तसेच नव्या संधीही चालून येतील.
■ नातीगोती या आठवड्यात दांपत्य जीवनात तुमचा काळ आनंदात जाणार आहे. अविवाहित मंडळींसाठी नव्या नात्याची शक्यता दिसून येत आहे. कुटुंबासोबत वेळ घालवल्यामुळे मानसिक शांती लाभेल. भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेणे तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते.
■ आरोग्य : या आठवड्यात आरोग्य सामान्य राहील पण तणाव घेणे आणि चिंता करणे टाळायला हवे. तुम्हाला पचनासंबंधित समस्या सतावण्याची शक्यता आहे. त्यामुळे खाण्या-पिण्याबाबत संतुलन राखावे व वेळच्या वेळी जेवण करावे. या दिवसांत बाहेरचे खाणे टाळणे तुमच्यासाठी योग्य राहील.
शुभदिनांक : ०४,०८,०९
शुभरंग : लाल, पिवळा, क्रीम
■ शुभवार रविवार, सोमवार, मंगळवार
दक्षता : या आठवड्यात भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नये व आर्थिक व्यवहारात सावध राहावे.
■ उपाय : या आठवड्यात सोमवारी शिवपिंडीवर दूधमिश्रित जल अर्पण करावे व 'ॐ नमः शिवाय' मंत्राचा १०८ वेळा जप करावा.