इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया मुंबईच्या संपादकीय मंडळावर गाेविंदप्रसाद मुंदडा

    04-May-2026
Total Views |
 
 

CA 
येथील चार्टर्ड (सीए) गाेविंदप्रसाद मुंदडा यांची वेस्टर्न इंडिया रिजनल काैन्सिल, दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया मुंबईच्या संपादकीय मंडळावर सदस्य म्हणून नुकतीच नेमणूक झाली आहे. ही नेमणूक इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष सीए साैरभ अजमेरा यांनी केली आहे.वेस्टर्न इंडियाच्या या काैन्सिलच्या अंतर्गत महाराष्ट्र, गुजरात आणि गाेवा ही तीन राज्ये येतात. गेल्या अनेक वर्षांपासून मुंदडा वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये कर आणि गुंतवणुकीसंदर्भातील विशेष लेख, तसेच माहिती देतात. त्यांच्या या अनुभवाचा इन्स्टिट्यूटला लाभ व्हावा, या हेतूने मुंदडा यांची निवड करण्यात आली आहे.याबद्दल मुंदडा यांनी इन्स्टिट्यूट आणि अजमेरा यांचे आभार मानले आहेत. मुंदडा यांनी या आधी अखिल भारतीय माहेश्वरी पत्रिका ‘माहेश्वरी’चे संपादन केले आहे. मुंदडा हे महेश मंत्र या प्रतिष्ठित मासिकाचे मानद संपादक आहेत. साेप्या भाषेत इन्कम टॅक्स हे सदर गेल्या पंधरा वर्षापासून ते ‘संध्यानंद’मध्ये ते लिहीत आहेत.