हा आठवडा तुमच्यासाठी ऊर्जा, उत्साह आणि नव्या संधींनी भरलेला राहील. कार्यक्षेत्रात नव्या जबाबदाऱ्या मिळतील व यश तुमच्या आत्मविश्वासावर अवलंबून असेल. एखाद्या वरिष्ठाशी वा सहकर्मचाऱ्याशी मतभेद संभवतो. त्यावेळी संयमाने वागावे. आर्थिक स्थिती सामान्य राहील. खर्चावर ताबा राखायला हवा.
■ नोकरी-व्यवसाय आठवड्याच्या सुरुवातीपासूनच कामाला वेग राहील. नव्या योजना बनतील व जबाबदाऱ्या वाढतील. नोकरदारांना मान-सन्मान व बढती मिळण्याचे संकेत आहेत. व्यापाऱ्यांना नवे ग्राहक व लाभाची संधी मिळेल. स्वतंत्रपणे काम करणाऱ्यांना बाहेरून लाभ मिळू शकतो.
■ नातीगोती या आठवड्यात अविवाहित जातकांना एखाद्या खास व्यक्तीला भेटण्याची संधी मिळेल. विवाहित जातकांच्या वैवाहिक जीवनात प्रेम आणि समजुतदारपणा वाढेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. मुलांनी मिळवलेल्या यशाचा आनंद साजरा कराल. मित्रांचे सहकार्य लाभेल.
:
■ आरोग्य या आठवड्यात आरोग्यबाबत बोलायचे तर तुमची ऊर्जा उत्तम राहील. पण मानसिक तणाव आणि अनियमित दिनचर्येमुळे तुम्हाला थकवा जाणवू शकतो. तो घालवण्यासाठी तुम्ही व्यवस्थित झोप घ्यायला हवी तसेच खाण्या-पिण्याबाबत समतोल राखायला हवा. डोकेदुखी व रक्तदाबासंबंधित समस्याबाबत दक्ष राहावे.
■ शुभदिनांक : ०४,०८,०९
शुभरंग : लाल, पिवळा, क्रीम
■ शुभवार रविवार, सोमवार, मंगळवार
■ दक्षता : या आठवड्यात घाईत निर्णय घेऊ नये व डोळे झाकून विश्वास ठेवू नये.
■ उपाय : मंगळवारी श्रीहनुमंताला शेंदूर व चमेलीचे तेल अर्पण करावे व ॐ हनुमते नमः चा १०८ वेळा जप करावा. गरजूंना जेवण द्यावे.