हा आठवडा तुमच्यासाठी नवे विचार व याेजना पुढे नेण्याचा काळ असणार आहे.तुमची रचनात्मकता आणि दूरदर्शीपणा तुम्हाला यश मिळवून देईल. कार्यक्षेत्रात नव्या संधी मिळू शकतात. ज्याचा याेग्य वापर करणे तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. आर्थिक स्थिती सुधारण्याचे संकेत आहेत.
नाेकरी-व्यवसाय : आठवड्याच्या सुरुवातीला कामात व्यस्तता राहील. नाेकरदारांनी कामात नावीन्य आणायला हवे. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. नव्या याेजना यशस्वी हाेऊ शकतात. व्यापाऱ्यांना नव्या संपर्कातून लाभ मिळेल व विस्ताराच्या संधी निर्माण हाेतील. तंत्र व संशाेधन क्षेत्रातील व्यक्तींना विशेष यश मिळेल.
नातीगाेती : या आठवड्यात तुमच्या दांपत्य जीवनात सामंजस्य टिकून राहील.अविवाहित जातकांसाठी नवे स्थळ चालून येण्याची श्नयता आहे. तुम्हाला तुमच्या कामात तुमच्या कुटुंबाची व मित्रांची मदत मिळू शकते. नात्यांमध्ये तुम्ही माेकळेपणाने बाेलणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.
आराेग्य : या आठवड्यात तुमचे आराेग्य सामान्य राहील पण तणाव आणि दिनचर्येत अनियमितपणा टाळायला हवा. तुम्ही पूर्ण झाेप घ्यावी व मानसिक संतुलन टिकवून ठेवावे. ज्यांना पाय व शिरांसंबंधित समस्या असतील अशा जातकांनी दक्षता बाळगायला हवी. याेग व प्राणायाम करणे उपयुक्त ठरेल.
शुभदिनांक : 03, 06, 07
शुभरंग : हिरवा, क्रीम, गुलाबी
शुभवार : बुधवार, शुक्रवार, शनिवार
दक्षता : या आठवड्यात तुम्ही अतिविचार व चिंता करणे टाळावे अन्यथा निर्णय घेणे कठीण हाेईल.
उपाय : शनिवारी शनिदेवाची पूजा करावी. काळे तीळ अर्पण करावेत व ॐ शं शनैश्चराय नम: चा 108 वेळा जप करावा..