पॅकेज्ड स्नॅ्नस आणि काेल्ड ड्र्निंसचा प्रजनन क्षमतेवर परिणाम

    31-May-2026
Total Views |
 

Health 
पॅकेज्ड फूड आणि अल्ट्रा-प्राेसेस्ड फूडचे अतिसेवन पुरुष आणि स्त्रिया दाेघांच्याही प्रजनन क्षमतेवर नकारात्मक परिणाम करू शकते. आधुनिक जीवनशैलीत पिझ्झा, बर्गर, पॅकेज्ड स्नॅ्नस, आणि गाेड पेयांचे प्रमाण वाढल्याने वंध्यत्वाची समस्या तरुण जाेडप्यांमध्ये झपाट्याने वाढत आहे.आजच्या वेगवान जीवनात, पॅकेज्ड स्नॅ्नस, काेल्ड ड्र्निंस आणि रेडी-टू- ईट जेवण यासारखे अल्ट्रा-प्राेसेस्ड पदार्थ आपल्या खाण्यात भरपूर प्रमाणात येतात.मात्र, जिभेचे चाेचले पुरवणारे हे खाद्यपदार्थ लठ्ठपणा तर देतातच त्याचा थेट परिणाम पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवरही हाेत आहे? नुकत्याच झालेल्या एका संशाेधनात याविषयावर धक्कादायक खुलासे झाले आहेत.हा अभ्यास काय म्हणताे ते जाणून घेऊया.
 
पॅकेज्ड फूड ज्या प्लॅस्टिकमध्ये साठवले जाते, त्यातून बाहेर पडणारी रसायने शरीरातील हार्माेन्सच्या कामात व्यत्यय आणतात. अन्नाचे आयुष्य वाढवण्यासाठी वापरण्यात येणारी रसायने (प्रिझर्व्हेंटिव्हज्) थेट प्रजनन अवयवांच्या आराेग्यावर परिणाम करू शकतात. पॅकेज्ड फूडमध्ये कॅलरीज जास्त आणि पाैष्टिकता कमी असते, ज्यामुळे लठ्ठपणा आणि चयापचयाशी संबंधित आजार हाेऊ शकतात.संशाेधन डेटा काय म्हणताे? नेदरलँड्समधील संशाेधक डाॅ. राेमी गेलार्ड यांच्या नेतृत्वाखाली एक अभ्यासकरण्यात आला, ज्यामध्ये बदलत्या काळातील खाणे आणि प्रजनन क्षमता यांच्यातील संबंधांचे सखाेल परीक्षण केले गेले. हे संशाेधन 2017 ते 2021 या काळात करण्यात आले.
 
या अभ्यासाचे वैशिष्ट्य म्हणजे गर्भधारणेपूर्वी पालकांचा आहार भविष्यातील मुलावर आणि प्रजननक्षमतेवर कसा परिणाम करताे हे समजून घेण्यासाठी 831 महिला आणि 651 पुरुषांचा खाण्यापिण्याच्या सवयींचाअभ्यास करण्यात आला.अभ्यासात असे दिसून आले आहे की स्त्रियांच्या एकूण आहाराच्या सरासरी, अल्ट्रा-प्राेसेस्ड अन्नाचा वाटा 22 टक्के आहे, तर पुरुषांसाठी हा आकडा किंचित जास्त आहे (25 टक्के).या संशाेधनाचे सर्वात चिंताजनक परिणाम पुरुषांशी संबंधित हाेते. डेटावरून असे दिसून आले आहे की जे पुरुष जास्त प्रमाणात प्रक्रिया केलेले पदार्थ खात हाेते त्यांच्यामध्ये व्यंधत्वाचा धाेका लक्षणीय प्रमाणात वाढला हाेता. म्हणजे अन्य पुरुषांच्या तुलनते प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ खाणाऱ्या पुरुषांची प्रजनन क्षमता कमी असल्याचे आढळून आले.