उन्हाळ्याच्या सुट्टीत शिका मधुबनी चित्रकला

    30-May-2026
Total Views |
 
madhubani
सुट्टी म्हटले की तुम्हा मुलांचा आनंद गगनात मावेनासा हाेताे ना ही सुट्टी तुमच्या हक्काची असल्याने त्याचा मनसाेक्त आनंद घ्या. पण, काही गाेष्टी मात्र, मी तुम्हांला आवर्जून करा, असं सांगेन. त्यातलं पहिली महत्त्वाची गाेष्ट म्हणजे, या सुट्टीमध्ये भरपूर वाचा. आजकाल तुमच्यापैकी बरेच जण इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये शिकतात. त्यामुळे मराठीतील गाेष्टींची पुस्तके जरूर वाचा. भरपूर खेळा. आपल्या राज्यात असलेले गडकिल्ले पहा, लेणी बघा यामुळे आपल्या राज्याच्या संस्कृती ओळख तुम्हांला हाेईल. निसर्गाचे वरदान असलेल्या काेकणातही नक्की फिरायला जा... या भटकण्यामुळे कायम सिमेंट काँक्रिटच्या जंगलात वावरणाऱ्या तुम्हा मंडळींची निसर्गाशी ओळख हाेईल.
 
या गाेष्टी करत असताना, कलेच्या प्रांतामध्ये मुशाफिरी देखील करा. नाट्यगृहांमध्ये जाऊन लहान मुलांसाठी असलेली नाटके पहा. या सुट्टीच्या काळात स्मार्टफाेन, लॅपटाॅप, व्हिडीओ गेम यांचा वापर कमी करा. कारण यामुळे तुमचे मनाेरंजन हाेईल, हे खरे आहे. पण, या निर्जीव साधनांमुळे तुम्ही एकलकाेंडे हाेऊन माणसांपासून लांब जातात ही गाेष्टही लक्षात ठेवा.मधुबनी चित्रकला ही बिहारमधील मिथिला भागातील आणि लगतच्या नेपाळमधील तराई भागातील चित्रकलेचा प्रकार आहे.मिथिला आर्ट या नावानेही चित्रकला ओळखली जाते. मधुबनी या शब्दाचा अर्थ मधाचे बन. सुंदर भाैमित्यि आकृत्या, नैसर्गिक रंग हे या मधुबनी चित्रकलेचे वैशिष्ट्य. राम, कृष्ण, सीता, काली, शिव आदी देव तसेच सूर्य, चंद्र, तुळशीसारख्या धार्मिक महत्त्व असलेल्या वनस्पती, विवाहसाेहळे यांचे चित्रण यात प्रामुख्याने आढळते.
 
सणवार, जन्म, विवाहसाेहळे, कालीपूजा, दुर्गापूजा आदी प्रत्येक औचित्यासाठी वेगवेगळी चित्रे काढली जातातमधुबनी चित्रकलेचा नेमका उगम काेणाला माहिती नाही मात्र मिथिलानगरीचा राजा जनक याने त्याच्या कन्येच्या, सीतेच्या विवाहसाेहळ्याच्या वेळी नगरीची सजावट करण्याचे आदेश कलाकारांना दिल्याचे सांगितले जाते. नेपाळ-बिहारमधील या भिंती रंगवण्याच्या कलेचा, भित्तीचित्रांचा मधुबनी चित्रकलेच्या उदयामध्ये माेठा वाटा असल्याचे मानले जाते. हे चित्रे प्रामुख्याने महिला काढत असत. मात्र अगदी आताआतापर्यंत ही कला या परिसराबाहेर माहितही नव्हती. 1934मध्ये या भागात झालेल्या भीषण भूकंपानंतर पाहणी करण्यासाठी आलेल्या तत्कालन ब्रिटीश अधिकारी डब्लू. जी. आर्चर याने काेसळलेल्या घरांच्या भिंतींवरही चित्रे रेखलेली दिसली. त्यानंतर ही कला प्रकाशात आली. स्वातंत्र्यानंतर देशाच्या हस्तकला बाेर्डाने मधुबनी चित्रकलेचा प्रसार करण्यासाठी महिला कलाकारांना भिंतींऐवजी कागदावर चित्रे काढण्यास प्राेत्साहन दिले. तुम्हाला आवड असेल तर ह्या शैलीत चित्र काढायला नक्की शिका.