गुरुग्राममधील ज्येष्ठ नागरिकांच्या निवृत्तीगृहात प्रवेश केल्यावर एखाद्या रिसाॅर्टमध्ये असल्यासारखे वाटते.सुस्थितीतील बाग, स्वच्छ मार्ग, शांततापूर्ण वातावरण. इथे ज्येष्ठांसाठी गायन, नृत्य, चित्रकला आदी कलांचा आनंद घेता येताे. एका ज्येष्ठ नागरिकाने सांगितले की, मुलगा अमेरिकेत व मुलगी लंडनमध्ये आहे. पण इथे आम्ही एकटे नाही.आम्ही आमच्या सारख्याच लाेकांमध्ये असल्याचा आनंद माेठा आहे.पाैष्टिक मेनूसह विविध सुविधा भाेजनगृहात पंचतारांकित हाॅटेलसारख्या सुविधा आहेत, जिथे पाेषणतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार संतुलित आणि पाैष्टिक जेवण तयार केले जाते. पाैष्टिक मेनूसह रेस्टाॅरंट्स, फिटनेस सेंटर्स, आराेग्यसेवा, स्विमिंग पूल, मनाेरंजन केंद्रे आणि वैयक्तिक काळजी यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत.
आर्थिकदृष्ट्या सुरक्षित पिढीला हवा चांगला अनुभव पाेलारिस फिनमार्ट या संपत्ती व्यवस्थापन प्लॅटफाॅर्मचे सह-संस्थापक, संदीप शुक्ला यांनी सांगितले की, ज्येष्ठ जनरेशन एक्स (ॠशप द) आर्थिकदृष्ट्या सुरक्षित, आत्मनिर्भर आहे. ते त्यांच्या कर्तृत्व, आकांक्षांना साजेसे असे आरामदायक सेवानिवृत्तीचे जीवन जगू इच्छितात.लग्जरी लिव्हिंगमध्ये, ते दरमहा 60,000 ते 1.5 लाख रुपये खर्च करत आहेत. संघटित प्रकल्पांमध्ये 90% पर्यंत जागा भरलेल्या दिसत आहेत. काही सरकारे देखील आलिशान ज्येष्ठ नागरिक निवासस्थाने बांधत आहेत. मध्य प्रदेशात, सरकारी सशुल्क ज्येष्ठ नागरिक निवासस्थाने दरमहा 40 ते 50,000 रुपयांमध्ये निवास, भाेजन आणि आराेग्यसेवा पुरवतात.
बाजारपेठ तयार असल्याने विकासकाचा वाढला रस हिरानंदानी कम्युनिटीजचे अध्यक्ष डाॅ. निरंजन हिरानंदानी यांनी सांगितले की, आतापर्यंत भारतातील वृद्धांची काळजी प्रामुख्याने कुटुंबांकडून घेतली जात हाेती. परंतु शहरीकरण, विभक्त कुटुंबांच्या वाढीमुळे, वृद्ध आता सामाजिक संबंधांसाठी व्यावसायिकरित्या व्यवस्थापित समुदायांकडवळत आहेत. हा वाढता कल ओळखून, विकासक रिअल इस्टेटमध्ये ‘सिनियर लिव्हिंग’ नावाचा विशेष मालमत्ता वर्ग तयार करत आहेत. यात आतिथ्य, आराेग्यसेवा, निवासी विकास यांचा समावेश आहे.
देशात राेज अंदाजे 19,500 लाेक 60 वर्षांचे हाेतात असाेसिएशन ऑफ सीनियर लिव्हिंग आणि पीडब्ल्यू यांच्या अहवालानुसार, भारतात दरराेज अंदाजे 19,500 लाेक 60 वर्षांचे हाेत आहेत. एकटे राहण्याऐवजी किंवा मुलांवर अवलंबून राहण्याऐवजी, एक माेठा वर्ग अशा समुदायांची निवड करत आहे, जिथे त्यांना सुरक्षितता, वैद्यकीय मदत, आराेग्य आणि सामाजिक संबंधांची साेय मिळते.
2050 पर्यंत लाेकसंख्येच्या 20% ज्येष्ठ नागरिक असतील ‘असाेसिएशन ऑफ सीनियर लिव्हिंग इंडिया’ चे अध्यक्ष राजपाल जी. यांनी सांगितले की, एका अंदाजानुसार, 2050 पर्यंत देशात 34.6 काेटी ज्येष्ठ नागरिक असतील, जे एकूण लाेकसंख्येच्या 20% पेक्षा जास्त आहे.या अहवालानुसार, देशभरात 20,000 पेक्षा जास्त ‘ज्येष्ठ नागरिक निवास युनिट्स’ आहेत. या क्षेत्रात दक्षिण भारताचे माेठे वर्चस्व असून, एकूण बाजारपेठेत त्याचा वाटा सुमारे 60% आहे.