श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे विविध 137 प्रकारच्या विविध तपासण्या करत आयाेजित माेफत महाआराेग्य शिबिरात 18631 जणांची तपासणी व उपचार करण्यात आले. पुणे शहरासह राज्याच्या विविध भागांतून आलेल्या रुग्णांच्या विविध तपासण्या करत साहित्य व औषधांचे वाटपही करण्यात आले.यासाठी पुणे जिल्ह्यातील 90 रुग्णालये व संस्थांच्या प्रतिनिधींनी शिबिरात अखंड 9 तास सेवा दिली.श्रीमंत थाेरले बाजीराव पेशवे रस्त्यावरील नू. म. वि. प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात आयाेजित महाआराेग्य शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डाॅ.रघुनाथ माशेलकर आणि आमदार हेमंतरासने यांच्या हस्ते झाले.यावेळी कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाच्या डाॅ. अंजली टिळेकर, डाॅ.संजीव डाेळे, डाॅ. संदेश पटवर्धन, ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष डाॅ.रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे, माणिक चव्हाण, काेषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सहचिटणीस अमाेल केदारी, उत्सव प्रमुख अक्षय गाेडसे, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित हाेते.
ट्रस्टतर्फे फिरता दवाखान्याचे लाेकार्पणही यावेळी करण्यात आले. ट्रस्टचे वैद्यकीय विभाग प्रमुख राजेंद्र परदेशी व सहकाऱ्यांनी शिबिराच्या नियाेजनात विशेष सहभाग घेतला. प्रत्येकाच्या आराेग्याची चाचणी हाेणे आवश्यक आहे. या चाचण्या याेग्य वेळेत झाल्या, तर नंतरचे दुष्परिणाम टाळता येतील. विकसित, संतुलित, समृद्ध, सुविद्य, सक्षम भारत व्हावा, यासाठी अशा शिबिरांच्या माध्यमातून व रुग्णसेवेच्या माध्यमातून ट्रस्टचे सुरू असलेले काम आशादायी आहे, असे डाॅ.माशेलकर यांनी सांगितले. आमदार हेमंत रासने यांनीही मनाेगत व्यक्त केले.या शिबिरासाठी सुमारे 15 हजार नागरिकांनी नाेंदणी केली हाेती. शिबिरात हृदय आजार, किडनी, नेत्र आजार, दंत उपचार, स्त्री राेग, मुलांच्या शस्त्रक्रिया, अपंगांना माेफत जयपूर फूट वाटप, रक्त तपासणी, रक्तदान शिबिर, ईएनटी, आयुर्वे दिक, हाेमिओपॅथी उपचार, अस्थिराेग, विविध थेरपी, रेडिओलाॅजी, श्रवण आणि स्पीच थेरपी हे उपचार विनामूल्य करून देण्यात आले. तसेच, राज्य शासनाचा आराेग्य विभाग व पुणे महापालिकेच्या विविध याेजनांचा लाभ कसा घ्यावा, याची माहितीही देण्यात आली.