येत्या 25 वर्षांत भारत संरक्षण यंत्रसामग्रीचा निर्यातदार देश बनणार असल्याने जगातील काेणतीही ताकद भारताला राेखू शकणार नाही. संरक्षण क्षेत्रात खासगी उद्याेजकांना वाव मिळत नव्हता, पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या ‘आत्मनिर्भंर भारत’ व ‘मेक इन इंडिया’मुळे खासगी संस्थांचा संरक्षण क्षेत्रात सहभाग वाढत असल्याने देशाचे संरक्षण सामर्थ्य वाढणार असल्याचा विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला.येथील औद्याेगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या ग्लाेब फाेर्ज या खासगी कंपनीच्या ताेफगाेळे उत्पादन प्रकल्पाचे लाेकार्पण करताना राजनाथ सिंह बाेलत हाेते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चाैहान, उद्याेगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, निबे समूहाचे अध्यक्ष गणेशनबे आदींसह लष्कराचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित हाेते.
केंद्राने संरक्षण उत्पादन क्षेत्रात धाेरणात्मक सुधारणा, थेट परकीय गुंतवणुकीस प्राेत्साहन, परवाना प्रक्रियेचे सुलभीकरण आणि स्वदेशीकरणाला चालना देणारे निर्णय घेतल्यामुळे खासगी क्षेत्राचा सहभाग लक्षणीयरीत्या वाढला आहे. संरक्षण उत्पादन क्षेत्रातील खासगी उद्याेगांचा वाटा आता 25 ते 3टक्क्यांपर्यंत पाेहाेचल्याची माहिती राजनाथ सिंह यांनी दिली.अहिल्यानगर हे संरक्षण उत्पादनाचे नवे आणि महत्त्वाचे हब म्हणून उदयास येत आहे. राज्यात नाशिक, पुणे, नागपूर आणि अहिल्यानगर येथे चार संरक्षण उद्याेग समूह विकसित करण्यात येत असून, संरक्षण उत्पादनात महाराष्ट्र देशात अग्रस्थानी आहे. शिर्डीच्या प्रकल्पामुळे सुमारे 5 हजार काेटींची गुंतवणूक झाली असून, 4 हजार युवकांना राेजगाराच्या संधी उपलब्ध हाेतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
संरक्षण उत्पादन क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, क्वांटम तंत्रज्ञान आणि हायपर साॅनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढत असून, भारत या क्षेत्रात वेगाने प्रगती करत आहे. केंद्राने संरक्षण क्षेत्र खासगी उद्याेगांसाठी खुले केल्यामुळे देशातील तरुणांच्या काैशल्याला नवी दिशा मिळाली आहे. लष्कराने अत्यंत अचूक व प्रभावी कारवायांद्वारे देशाच्या सुरक्षेसाठी सक्षम क्षमता सिद्ध केल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी लष्कराच्या सज्जतेचे काैतुक केले. देशाच्या सुरक्षेसाठी आवश्यक ते प्रत्युत्तर देण्यास संरक्षण दले समर्थ असल्याचे जनरल चाैहान यांनी सांगितले. प्रास्ताविक गणेश निबे यांनी केले. विखे पाटील यांनी आभार मानले.कार्यक्रमापूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्र्यांनी साईबाबा समाधीचे दर्शन घेतले