डाेअरमन असतात ते लक्झुरी एक्स्पिरियन्स देण्यासाठी. एक टिपटाॅप माणूस आपलं स्वागत करताे आहे, इथून ताे अनुभव सुरू हाेताे.मार्केटिंग गुरू राेरी सदरलँड यांचा एक ‘डाेअरमन फॅलसी’ नावाचा सिद्धांत फार इंटरेस्टिंग आहे. डाेअरमन म्हणजे दरवान.
माेठमाेठ्या लक्झुरी हाॅटेल्सच्या दारात विशिष्ट पाेशाख केलेले डाेअरमन तैनात असतात. पाहुणे तिथे पाेहाेचले की ते दरवाजा उघडतात, त्यांचं स्वागत करतात.एका हाॅटेलने हिशेब केला की यांच्यासाठी आपण जाे पगार माेजताे ताे वाचवता येईल. एक साधा सरकता दरवाजा बसवला तरी केवढा खर्च वाचेल (सॅव्हाॅयसारख्या प्रतिष्ठित हाॅटेलात काही डाेअरमनना 32,000 पाऊंड पगार असताे!).
त्यांनी तसं केलं, डाेअरमन काढून टाकले आणि त्यांच्या ग्राहकांच्या तक्रारी वाढल्या. वेळेवर कार मिळाली नाही, ओझं वाहून आणावं लागलं, तुमच्या आतिथ्यशीलतेमध्ये काहीतरी उणीव आहे, पूर्वीचा उबदारपणा जाणवत नाही, वगैरे वगैरे. काही नेहमीच्या ग्राहकांनी हाॅटेलात येणं-राहणंच बंद केलं. सदरलँड सांगतात की दरवाजा उघडणं आणि बंद करणं हे डाेअरमनचं काम आहे, हा या मूर्खपणाचा पायाच चुकीचा आहे. डाेअरमन असतात ते लक्झुरी एक्स्पिरियन्स देण्यासाठी. एक टिपटाॅप माणूस आपलं स्वागत करताे आहे, इथून ताे अनुभव सुरू हाेताे. डाेअरमन सामान आत घ्यायला मदत करतात, कार बाेलावतात, आतल्या बेलबाॅयला बाेलावतात, काही अडचण असेल तर ती साेडवतात, माहिती देतात. सरकता दरवाजा बसवून पैसे वाचतात, पण दर्जा घसरताे.