सर्कसमध्ये सगळ्यात आधी इंट्री करतात ते विदुषक. हे कलाकार प्रेक्षकांना हसवण्याचे काम करतात. स्वतः रडतात पण त्यांना पाहून इतर हसतात. आपले आयुष्य देखील असेच आहे. बाळ जन्माबराेबर रडते. पण, त्याला रडताना पाहून दुसऱ्यांना आनंद हाेताे. आयुष्याचे हे पहिलेच सत्य आहे की, तुमचे रडणे नेहमीच दुसऱ्यांना दुःखी करेल असे नाही. तर, इतरांना त्यापासून आनंदही मिळताे. तुमच्यामध्ये स्वतः रडून दुसऱ्यांना आनंदित करण्याची क्षमता असली पाहिजे.सहकार्यावर विश्वास वाढविणारा झाेपाळ्याचा खेळ सर्कशीमधील दाेरीवर संतुलन साधत, एका टाेकापासून दुसऱ्या टाेकापर्यंत जाण्याचा, एका झुल्यावरून दुसऱ्या झुल्यावर जाण्याचा खेळ अत्यंत धाेकादायक असताे. आयुष्यात असे धाेके माणसाला जवळ-जवळ प्रत्येक क्षणी घ्यावे लागतात. या खेळातील सर्वांत महत्त्वाचा भाग म्हणजे सहकार्यावरील विश्वास ठेवणे.
आपला झाेपाळा साेडून समाेरच्या व्यक्तीच्या दिशेने उडी घ्यायची आणि ती आपल्याला झेलून घेईल, या विश्वासावरच खेळ टिकलेला असताे.आयुष्याचेही असेच आहे. आपल्या बराेबरील व्यक्ती काेणत्याही कठीण परिस्थितीमध्ये आपला हात साेडणार नाही, असा विश्वास आल्यानंतर आपण पाहिजे तेवढ्या उड्या मारण्यास तयार हाेताे. त्यामध्ये साथ देणाऱ्या व्यक्तीची जबाबदारी वाढते. तिला स्वतःचे संतुलन राखून दुसऱ्याच्या आयुष्यही टिकवायचे असते. ही जबाबदारी कदाचित स्त्रया चांगल्या पद्धतीने निभावू शकतात.सामाजिक, गृहस्थी जीवन या विश्वासाच्या पायावरच उभारले आहे.आयुष्यात संतुलन शिकवणारे एक्राेबेटिक, पाेल बॅलन्सिंग सर्कशीत असतात एक्राेबेटिक खेळणाऱ्या मुली. शरीराला वेगवेगळ्या प्रकारे वाकवून, संतुलन ठेवून त्या प्रेक्षकांचे मनाेरंजन करतात.
यातून शिकायला मिळते की, आयुष्यात संतुलन साधण्यासाठी कुठे वळावे लागते, कुठे झुकावे लागते, कुठे ताठपणे उभेही राहावे लागते. केवळ सरळ रेषेत राहून आयुष्याचे संतुलन साधता येत नाही. बरेचदा एकाच ठिकाणी गाेलगाेलही फिरावे लागते.एखादा हात, एखादा आधार साेडून द्यावा लागताे किंवा ताे सुटून जाताे. पण आपल्याला आपली गती थांबवायची नाही. आपल्याला तर सतत पुढेच जायचे आहे.काही कलाकार मल्लखांब, पाेल बॅलन्सिंग खेळात बॅलन्सचे काैशल्य दाखवितात. हा खेळ एकमेकांचा हात धरून आयुष्य सांभाळण्याचा संदेश आहे. जर एकाचा जरी हात सुटला तरी सगळेच अपूर्ण राहू शकतात. एकमेकांचा हात न सुटल्यास जीवनाच्या चढ-उतारांमध्ये काेणताच त्रास हाेणार नाही. विविध स्थितीमध्ये एकत्र राहून टिकण्याची भावना हा खेळ शिकवताे.नाते टिकवण्यासाठी एकमेकांना पकडून, जखडून ठेवणे फारच आवश्यक असते.
कठीण परिस्थितीतून बाहेर पडायला हिंमत देणारे खेळ सर्कशीत काही युवती आगीच्या रिंगणातून जाणे, तलवारीवर बॅलन्स राखणे आदी खेळ करतात. प्रत्येकाला आपल्या पाेटासाठी पैसे कमवावेच लागतात. त्यासाठी कधी आगीसारख्या परिस्थितीतून, तर कधी कड्यावरून चालावे लागते. त्यातून आरपार गेल्यावरच खरे यश, सुख मिळते.गाेल फिरणाऱ्या टेबलवर स्केटिंग करणाऱ्या युवती शिकवतात की, जीवन सतत फिरणारे असते आणि फिरणारेच राहणार. त्यामध्ये आपले संतुलन आपल्याला स्वतःलाच राखायचे आहे. आपण फक्त एकमेकांचा हात पकडू शकताे. कुठली एक व्यक्ती आधार झाली तर दुसऱ्याचे आयुष्य आपाेआपच सांभाळले जाते. ईश्वर नावाच्या रिंगमास्टरच्या आधीन आयुष्य शेवटी खेळ येताे घाेडा, कुत्रा, पाेपट, हत्तींचा.
हे प्राणी त्यांच्या रिंगमास्टरच्या सांगण्याप्रमाणे खेळ दाखवतात. हा खेळ आयुष्यासाठी फारच महत्त्वाचा आहे. यातून धडा मिळताे की दुसऱ्यांचे आदेश मानून चालण्यामध्ये धाेके जास्त असतात. खराेखर, कुणाच्या आधीन राहायचेच असेल तर ईश्वराच्या आधीन राहावे. हा रिंगमास्टर कधीही आपल्याला जाेखमीत टाकणार नाही. जर जाेखीम असेलच तर त्यामधून बाहेर काढण्याची क्षमताही त्याच्यामध्ये आहे.सर्कशीच्या तीन तासांच्या खेळात विविध लाेक अनेक खेळ दाखवतात. तसेच आपणही जन्म झाल्यापासून विविध भूमिका करताे.त्यालाही वेळेचे बंधन आहे. त्या वेळेत पुरेसे काम करू शकला नाही तर आपल्याला दुसरी संधी मिळत नाही. जन्मापासून मृत्यूपर्यंत माणसाचे कर्तृत्व म्हणजे आयुष्याची सर्कस.जगामध्ये तुम्ही इंट्री घेतल्यापासून एक्झिटपर्यंत आपण करत असलेल्या भूमिकांतूनच आपण अमरत्व प्राप्त करताे.