हर्षवर्धन नवलाई याचा आय.सी.एस.ई.दहावीत प्रावीण्य मिळवल्याबद्दल सत्कार

    25-May-2026
Total Views |
 
 
 
SSC
सांगली येथील सामाजिक कार्यकर्ते वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे राज्य केंद्रीय सदस्य मारूती नवलाई यांचे चिरंजीव हर्षवर्धन याने आयसीएसई बाेर्डाच्या दहावी इयत्तेच्या परीक्षेत उत्कृष्ट प्रावीण्य मिळवल्याबद्दल बिरनाळे फाउंडेशन व नगरसेवक सागर बिरनाळे मित्रपरिवार यांच्या वतीने खासदार विशाल पाटील यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला.यावेळी शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष नगरसेवक राजेश नाईक, मनपा विराेधी पक्षनेते मंगेश चव्हाण, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ऋषिकेश लाड, वसंतदादा बंडुजी पाटील ट्रस्टचे अध्यक्ष समीर भिडणारे, नगरसेवक अमित शहा, हर्षवर्धन पाटील, मयूर पाटील, अभिजित काेळी, नगरसेविका वर्षा निंबाळकर, अश्विनी कदम, राज्य सरपंच परिषदेचे भगवान केंगार, सामाजिक कार्यकर्ते संजय काळाेखे, प्रकाश बराेडाेले, आशा पाटील, अश्विनी नवलाई, फिराेज जमादार, साेशल मीडिया कार्याध्यक्ष ललित दाभाडे, संभाजी पाटील, अनिल नागरे, उदय निकम, चंदू पाटील, नितीन पाटील इ. मान्यवर उपस्थित हाेते.