माैजे आगवण, डहाणू येथील स्वत:च्या फार्महाउसवर अॅड. नितीन गांगल यांनी डाॅ. स्वाती कुलकर्णी यांच्या सीजी केअर्स फाउंडेशनच्या टीमच्या सहयाेगाने आदिवासी बांधवासाठी आराेग्य शिबिराचा प्रकल्प 16 मे राेजी यशस्वीपणे राबवला. या शिबिरात माेफत आराेग्य सुविधा पुरवण्यासाेबतच अॅनिमिया, शुगर, बीपी, श्रवणक्षमता, डाेळे तपासणी, कॅन्सरवरील प्राथमिकतपासणी, फुफ्फुस क्षमा, ए्नस रे, इसीजी यासारख्या तपासण्या करण्यात आल्या.या प्रकल्पास 150 आदिवासी बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमानंतर सर्व लाभार्थ्यांची व उपस्थितांची जेवणाची साेय करण्यात आली हाेती.यावेळी मिहीर शहा, रविंद्र फाटक, खंबाळे आश्रम शाळेचे मुख्याध्यापक व तांडेल सर इ. मान्यवर उपस्थित हाेते.या कार्यक्रमाला नितीन गांगल यांच्या कुटुंबीयांचा व इतर ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग लाभला.