येथील डाॅ. हाेमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. राजनीश कामत यांची काेल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा कुलपती जिष्णु देव वर्मा यांनी डाॅ.कामत यांच्या नियुक्तीची घाेषणा केली.डाॅ. कामत यांची नियुक्ती पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी किंवा वयाची पासष्ट वर्षे पूर्ण करतील, यापैकी जी तारीख अगाेदर असेल त्यातारखेपर्यंत असेल. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. दिगंबर शिर्के यांचा कार्यकाळ 7 ऑक्टाेबरला संपल्यामुळे हे पद रिक्त झाले हाेते.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. सुरेश गाेसावी यांच्याकडे विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा अतिरिक्त कार्यभार साेपवण्यात आला हाेता.डाॅ. कामत यांनी शिवाजी विद्यापीठातून इलेक्ट्राॅनिक्स विषयात एम.एस्सी., तसेच गाेवा विद्यापीठातून पीएच.डी. प्राप्त केली असून, त्यांना अध्यापन, संशाेधन व प्रशासनाचा व्यापक अनुभव आहे.