
जगभरातील सरकारी, औद्याेगिक, शैक्षणिक व संशाेधन संस्थांच्या समन्वयातून ऊर्जा व पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या ग्लाेबल एनर्जी अॅण्ड एन्व्हायरमेंट फाउंडेशनच्या (जीईईएफ) वतीने महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचा विद्युत क्षेत्रात मानव संसाधनातील कामगिरीसाठी ‘ग्लाेबल एचआर लीडर ऑफ द इयर-2026’ पुरस्काराने गाैरव करण्यात आला. ‘जीईईएफ’ने दिल्लीत ‘जागतिक ऊर्जा नेतृत्व परिषदे’चे आयाेजन केले हाेते. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लाेकेश चंद्र यांच्या मार्गदर्शनात पवार यांनी विद्युत सुरक्षिततेचे उपक्रम व त्यासाठी जागतिक विक्रमी लाेकसहभाग, कर्मचारी कल्याण व प्राेत्साहनपर धाेरण, कर्मचारी संघटना संवाद-उपक्रम, आधुनिक काैशल्य विकास प्रशिक्षण, कर्मचाऱ्यांना हरित ऊर्जेसाठी प्राेत्साहन यासारखे कर्मचारी हितैषी अनेक उपक्रम राबवले. या कामगिरीचे मूल्यमापन करून ‘जीईईएफ’च्या निवड समितीकडून पवार यांचा ‘ग्लाेबल एचआर लीडर ऑफ द इयर-2026’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. भारतातील रशियन फेडरेशनचे उपायुक्त डाॅ. एव्हगेनी ग्रिव्हा, आइसलँडचे राजदूत बेनेडिक्ट हाेस्कुल्डसन आणि निती आयाेगाचे माजी सदस्य डाॅ.
विजयकुमार सारस्वत यांच्या हस्ते पवार यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.