तुम्हाला तुमचे स्वत:चे असे मत असू द्या

    24-May-2026
Total Views |
 

vote 
 
स्पर्धेच्या युगामध्ये टिकून राहण्यासाठी किंबहुना आपली छाप पाडण्यासाठी आपल्या व्य्नितमत्त्वामध्ये सकारात्मक गाेष्टींचा समावेश असण अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी सर्वांत महत्त्वाची गाेष्ट म्हणजे आपण पण स्वत:साठी म्हणजेच आत्मपरीक्षणासाठी वेळ देणे गरजेचे आहे. काही गाेष्टी व्य्नितमत्त्वाच्या सुधारणा करण्यासाठी उपयाेगात येऊ शकतात.स्वत:ला ओळखा, आपली बलस्थाने आणि कमकुवत बाजू काेणत्या याची जाणीव असणे फार गरजेचे आहे. आपल्यामधील सकारात्मक आणि नकारात्मक अशा दाेन्ही गाेष्टींची यादी करा. नकारात्मक गाेष्टी आणि कमकुवत बाजू कशा कमी करता येतील, यावर काम करा.आपल्या दैनदिन जीवनामध्ये आणि वागण्या, बाेलण्यामध्ये कायम सकारात्मकता राहू द्या.यामुळे तुम्ही समाेरच्या व्य्नतीवर एक प्रभावी छाप पाडून जाता.
 
तुमच्या बाेलण्यामध्ये कुठेही नकारात्मकता दिसता कामा नये. लक्षात असू द्या. फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन स्वत:चे मत असू द्या. काेणताही प्रसंग असू द्या तुम्हाला तुमचे स्वत:चे असे मत असावे. तुमच्या मतांमध्ये ठामपणा नसेल तर तुम्हाला गृहित धरले जाईल आणि तुम्ही स्पर्धेमधून आपाेआप बाहेर पडाल. दरराेज वेळ काढून आवडीच्या गाेष्टी वाचत चला. वाचनाने चिंतन आणि विचार व ज्ञानकक्षा विस्तारल्या जातात. तसेच आवडत्या गाेष्टींना वेळ द्या.छंद जाेपासा. सकारात्मकता आपाेआप वृद्धिंगत हाेईल.
दर आठवड्याला किमान एक माणूस जाेडा. त्यांच्याशी चर्चा करा.संभाषणाने व्य्नितमत्त्व विकासात भर पडेल.तसेच तुम्हाला नवीन गाेष्टी समजतील. सर्वांत महत्त्वाचा मुद्दा, स्वत:च्या गुणांची कदर करा.फ्नत मर्यादा ओलांडू नका. असे व्हायला नकाे की क्षमता असून देखील तुम्हाला तिथपर्यत पाेचता येणार नाही.