असाे..., उष्णता तर आपण राेखू शकत नाही. पण अशी काही याेगासने आहेत जी आपल्या शरीराला थंड ठेवून उन्हाळ्यात आरामाचा अनुभव देतात.जसे की पृथ्वी मुद्रा. अनामिका (रिंग फिंगर) चे टाेक अंगठ्याच्या टाेकावर ठेवा. असे दाेन्ही हातांनी करा. त्यानंतर या मुद्रेतच हात मांड्यांवर ठेवून डाेळे मिटून पाच मिनिटांपर्यंत बसा.ही मुद्रा तुम्ही वारंवार करू शकता. पृथ्वी मुद्रेमुळे तापा पासून सुटका मिळते. उष्णतेमुळे येणारा थकवा आणि कंटाळ्यापासून मुक्ती मिळते. स्टॅमिना (शारीरिक क्षमता) वाढताे. काेरडी त्वचा आणि फाटलेले ओठ मऊ हाेण्यास मदत मिळते.उष्णतेमुळे हाेणाऱ्या त्वचेच्या लर्जीपासून वाचता येते.शरीराच्या आत असणारे उती (टिश्यूज) मजबूत हाेतात. अल्सर, सांधेदुखी आणि आर्थरायटिस (संधिवात) मध्ये आराम मिळताे.
त्याचप्रमाणे हार्माेन्स संतुलित हाेतात.
ही शंख मुद्रा सुद्धा उन्हामुळे येणारा ताप आणि त्वचेच्या लर्जीमध्ये आराम देते. त्याचप्रमाणे उष्णतेमुळे घशाला पडणारा काेरडेपणा राेखते. उष्णतेमुळे स्वभावात येणारा चिडचिडपणा नयंत्रणात ठेवून मेंदू शांत राखण्यात आणि ताणतणाव दूर करण्यात सहाय्यक ठरते. यासाठी डाव्या हाताचा अंगठा उजव्या हाताने पकडा. डाव्या हाताच्या अंगठ्याला वरच्या बाजूला घेऊन जा.त्यानंतर अंगठ्याला उजव्या हाताच्या मधल्या बाेटावर ठेवा. या मुद्रेत हात छातीजवळ घेऊन या. डाेळे बंद करून या स्थितीत किमान तीन मिनिटांपर्यंत बसा. थाेड्याच वेळात तुम्हाला ताजेतवाने आणि थंड वाटू लागेल.अशीच दुसरी एक अतिशय साेपी मुद्रा तुमच्या शरीरातील विषारी घटक (टाॅक्सिन्स) बाहेर टाकण्यास मदत करेल, परिणामी तुमच्या शरीराला अंतर्गत थंडावा मिळेल. या मुद्रेचे नाव आहे अपान मुद्रा. मध्यमा (मिड्ल फिंगर) आणि अनामिकाच्या टाेकाला अंगठ्याच्या टाेकाने दाबा. असे दाेन्ही हातांनी तीन ते पाच मिनिटांपर्यंत करा.