आहारातील पाेटॅशियमची पूर्तता फळं-भाज्यांच्या माध्यमातून हाेते.चयापचयात पाेटॅशियमची भूमिका महत्त्वाची असते.पाेटॅशियमच्या कमतरतेमुळे पेशी कमजाेर हाेतात किंवा मानसिक विषमता निर्माण हाेते.टिटाेफन हे एक आवश्यक अॅमिनाे अॅसिड आहे, जे फळं आणि भाज्यांमध्ये आढळतं. अनेक प्रकारचे ट्रेस एलिमेंट आणि अकार्बनिक घटक शरीराच्या इन्झाइम तंत्रात महत्त्वाची भूमिका बजावतात. ज्यामुळे शरीराची प्राेटिन आणि हार्माेन संरचना टिकून राहण्यास मदत हाेते. समताेल आहारासाठी वेगवेगळ्या घटकांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला दिला जाताे.