उशिरा बाेलणारी मुले...

    02-May-2026
Total Views |
 
 
child
 
बाळ जसजसे माेठे हाेत जाते तस तसे आई वडील त्याचा आवाज ऐकण्यासाठी उत्सुक हाेतात. मुलाचे बाेबडे बाेल त्यांना एक वेगळाच आनंद देताट. सहसा मुले एक वर्षानंतर हळूहळू बाेलायला सुरुवात करतात.स्पष्ट नसले बाेलत तरी कानावर सततचे शब्द पडल्याने आणि आपल्या ओठांच्या हालचाली ओळखून ते बाेलण्याचा प्रयत्न करतात आणि अशा प्रकारे त्यांच्या बाललीला सुरु हाेतात.मात्र बऱ्याचदा काही मुले याला अपवाद ठरतात आणि वयाची 3 वर्षे उलटून गेली तरी हि मुले स्पष्ट बाेलत नसतात किंवा कधीकधी बाेलतच नाहीत. फार कमी वेळा ताेंडातून शब्द काढतात. अशा स्थितीत या गाेष्टीकडे अजिबात दुर्लक्ष करू नये आणि हि एक समस्या समजून त्याकडे गांभिर्यानेच पाहावे. आज आपण या लेखातून जाणून घेऊया कि का काही बाळे उशिरा बाेलतात? त्यांची लक्षणे काेणती आणि त्यावर काही उपचार उपलब्ध आहेत का?
 
बाळ जर उशिरा बाेलत असले वा त्याने अजूनही बाेलणे सुरु केले नसेल तर त्याला स्पीच डिले असे म्हणतात. तुम्ही लक्ष दिलं असेल कि दाेन महिन्यांपर्यंत बाळ चित्र विचित्र आवाज काढायला सुरुवात करते.मात्र अशाप्रकारे जर बाळ बाेलत नसेल तर याला स्पीच डिलेचे सुरुवातीचे लक्षण मानले जाऊ शकते. 18 महिन्यांपर्यंत सामन्यत: बाळ पप्पा, मम्मी बाेलू लागते परंतु जर तुमचे बाळ दाेन वर्षे हाेऊनही किमान 25 शब्द सुद्धा बाेलत नसले वा अडीच वर्षाचा हाेऊनही दाेन वाक्यबाेलत नसेल किंवा तीन वर्षांचा हाेऊनही 200 शब्द बाेलत नसेल तसेच साधे साधे शब्द बाेलताना सुद्धा त्याला अडचण हाेत असेल वा ताे विसरत असले तर हि सगळी स्पीच डिलेची लक्षणे आहेत.स्पीच डिलेची अनेक कारणे असू शकतात. सगळ्यात प्राथमिक कारण हे असू शकतं की त्याच्या ताेंडात काही समस्या आहे. ताेंड वा जीभेमध्ये काही समस्या असल्यास स्पीच डिले हाेऊ शकते.
 
अजून एक कारण म्हणजे स्पीच एन्ड लेन्ग्वेज डिसाेर्डर हाेय. यामध्ये तीन वर्षाचे हाेऊनही बाळ जास्त शब्द बाेलू शकत नाही. अशा स्थितीत त्याला स्पीच डिले समस्या झाल्याचे नाकारता येत नाही. बाळाची ऐकण्याची क्षमता कमजाेर असेल तर त्याला शब्द कळत नाहीत व ताे बाेलतही नाही. हे सुद्धा स्पीच डिलेचे एक महत्त्वाचे कारण आहे.याशिवाय सुद्धा अशी अनेक करणे आहेत जी स्पीच डिलेला कारणीभूत ठरू शकतात. जसे की स्टीम्यूलेशनची कमतरता हाेय. बाेलताना आपण खूप शब्द नव्याने शिकताे मात्र जर तुम्ही काेणाशी बाेललाच नाहीत तर तुम्ही काही शिकूच शकणार नाही. बाळाच्या स्पीच आणि लेन्ग्वेज डेव्हलपमेंट मध्ये आसपासचे वातावरण महत्त्वपूर्ण भूमिका निभावते. जर काेणी बाळाशी बाेललच नाही तर बाळ तरी कसे बाेलेल.
 
ऑटिज्म स्पेक्ट्रम डिसऑर्डर हे सुद्धा स्पीच डिलेचे कारण असून वाक्य तयार हाेण्या ऐवजी एकच वाक्य दाेनदा बाेलणे आणि पुन्हा पुन्हा तसेच बाेलणे हे ऑटिज्म स्पेक्ट्रम डिसऑर्डरचे लक्षण आहे. नसांशी निगडीत काही विकार सुद्धा स्पीच साठी आवश्यक असणाऱ्या स्नायुंना प्रभावित करतात. यात सेरेब्रल पाल्सी, मस्कुलर डिस्ट्राेफी आणि ट्रामीटिक ब्रेन इंन्जुरी यांचा समावेश आहे.
स्पीच लेन्ग्वेज थेरेपीच्या मदतीने बाळाच्या या समस्येवर उपचार केले जाऊ शकतात. याशिवाय बाळाला ज्या समस्येमुळे बाेलण्यास विलंब हाेत आहे त्यावर उपचार करून सुद्धा स्पीच डिले ठीक केला जाऊ शकताे.पालक सुद्धा बाळाची बाेलण्यात मदत करू शकतात.घरात प्रत्येकालाच बाळाचे पहिले बाेलणे ऐकण्याची उत्सुकता असते. परंतु काही बाळे उशिरा बाेलू लागतात.अशावेळी अजिबात काळजी न करता वैद्यकीय मद