हावभावावरून हाेणाऱ्या पतीचा स्वभाव ओळखा

    15-May-2026
Total Views |
 

thoughts 
 कपाळ : रुंद आणि उंच कपाळ असलेली व्यक्ती नशीबवान मानली जाते. अशा कपाळावर रेषा किंवा नसांचे जाळे नसते. कपाळावर आठी पडल्यास रेषा दिसत असतील, तर समजावे की ती व्यक्ती काेणत्याही विषयावर खूप विचार करून निर्णय घेते आणि छाेट्याछाेट्या गाेष्टींची काळजी करत असते.
 
 हात : ज्या पुरुषांच्या हातावर खूप केस असतात, ते राेमँटिक असतात आणि नशीबवानही असतात. त्यांना आरामदायी जीवन जगणे जास्त आवडते. याउलट, केस नसलेले हात असलेले पुरुष लाजाळू आणि संकुचित स्वभावाचे असतात. असे लाेक स्वच्छताप्रिय आणि शिस्तप्रिय असतात. तसेच, मऊ आणि उंच भाग (पर्वत) असलेले हात असलेले लाेक भाग्यवान असतात.खडबडीत हात आयुष्यातील मेहनत आणि संघर्षाचे सूचक आहेत. जर हाताची बाेटे एकसमान जाड, लांब आणि मऊ असतील तर ती व्यक्ती कलाप्रिय आणि हुशार असेल. पण जर बाेटांना गाठी असतील, तर ती व्यक्ती विचारवंत आणि दार्शनिक प्रवृत्तीची असेल.
 
 हसण्याची पद्धत: वातावरण हलके ठेवण्यासाठी जेव्हा मुलगा हसताे, तेव्हा त्याच्या हसण्याच्या पद्धतीकडे लक्ष द्या. थाेडे ताेंड उघडून मध्यम आवाजात हसणे हे साैम्य स्वभावाचे लक्षण आहे. पूर्ण ताेंड उघडून जाेरात हसणे हे स्पष्ट वक्तेपणा आणि खिलाडूवृत्ती व्यक्त करते; पण असे लाेक थाेडे प्रदर्शन करण्यावरही विश्वास ठेवतात. हसताना शरीर जास्त हलवणे चांगले मानले जात नाही. लहान लहान गाेष्टींवर हसणारे लाेकआपल्या मनातील गाेष्ट लपवण्यात पटाईत असतात. हसताना डाेळे फिरवणारे किंवा डाेळे मिटून हसणारे लाेक चलाख आणि स्वार्थी असू शकतात.
 
 व्यवहार (वागणूक): बाेलताना मुलगा जर हात जास्त हलवत असेल किंवा पायावर पाय टाकून बसला असेल, तर समजावे की ताे देखावा करण्यावर विश्वास ठेवताे आणि सर्वांचे लक्ष स्वतःकडे वेधून घेऊ इच्छिताे.बसल्या बसल्या पाय हलवणे, हात चाेळणे, अंगठी फिरवणे किंवा कारणाशिवाय वारंवार इकडे-तिकडे पाहणे हे मनातील गाेंधळाचे लक्षण आहे. असे वर्तन दर्शवते की ताे त्या वातावरणात साेयीस्कर अनुभवत नाहीये. शांत आणि साैम्यपणे बसून, मंद स्मितहास्य करून काही विचारले किंवा उत्तर दिले, तर ताे मुलगा काळजी घेणारा आणि परंपरांचे पालन करणारा असताे.
 
चहा किंवा काॅफीचा कप नजाकतीने पकडणारे आणि जेवताना काट्या-चमच्याचा आवाज न करता हळू खाणारे लाेक शिष्ट आणि सभ्य असतात.याउलट, फक्त खाण्यावर लक्ष देणारे लाेक मबिंदासफ स्वभावाचे आणि काेणत्याही वातावरणात स्वतःला जुळवून घेणारे असतात. अशा प्रकारे हावभाव आणि शारीरिक हालचालींवर लक्ष देऊन तुम्ही जाणून घेऊ शकता की, तुम्हाला पाहायला आलेल्या मुलामध्ये तुमच्या स्वप्नातील राजकुमारासारखे गुण आहेत की नाही.