अधिकमासाच्या पावन मुहूर्तावर श्री गणेश गीतेतील भ्नितयाेग मांडण्यासाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाने येत्या रविवारपासून (17 मे) प्रवचनमाला आयाेजिली आहे. यवतमाळ वणीचे प.पू. गाणपत्य विद्यावाचस्पती स्वानंद पुंड शास्त्री महाराज श्री गणेश गीतेतील भ्नितयाेगावर निरुपण करणार असून, प्रवचनमाला सर्वांसाठी विनामूल्य खुली आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी दिली. श्रीमंत थाेरले बाजीराव रस्त्यावरील नू.म.वि.प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सभागृहात 17 ते 23 मे या काळात राेज सायंकाळी 6.30 ते 8 यावेळेत ही प्रवचनमाला हाेणार आहे. भक्ती करायची म्हणजे नेमके काय? आपण करताे ती भक्ती याेग्य हाेत आहे का आणि त्यात प्रगती हाेत आहे का? भक्तीचे नेमके फळ काय, या सर्व विषयांचे सविस्तर स्पष्टीकरण स्वानंद पुंड शास्त्री महाराज करणार आहेत. गणेशभक्तांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टने केले आहे.