आत्मयाचे नाना गुण । ब्रह्म निर्विकारनिर्गुण ।।2।।

    14-May-2026
Total Views |
 
 

saint 
आत्मा इतकी विविध अमाप व असीम रूपे घेताे की त्यांची गणना करणेसुद्धा शक्य हाेणारे नाही.पुराणातून वर्णन केलेले तेहतीस काेटी देव, अठ्ठ्याएेंशी हजार ऋषी, साडेतीन काेटी पिशाच्च याेनी, छप्पन काेटी चामुंडा, नऊ काेटी कात्यायनी आणि अर्थातच भूतलावर वसणारे काेट्यवधी प्राणी ही आत्म्याचीच रूपे आहेत. नभांगणातील सूर्य, चंद्र, ग्रह, तारे, नक्षत्रे व सूर्यमाला आणि मेघमंडळे ही सुद्धा आत्म्यामुळेच आहेत. देव, मानव आणि दानव, सर्व जीव आणि भाव व अभाव हेसुद्धा आत्म्यामुळेच घडतात. असे आत्म्याचे गुण व प्रगटीकरण कितीही वर्णन करून सांगितले तरी ते पूर्ण हाेऊ शकणार नाही कारण त्याला सीमा नाही. आत्म्याचे असे असंख्य गुण असले तरी परब्रह्म मात्र निर्गुण आणि निर्विकार आहे हे परमसत्य ओळखले पाहिजे. आत्मा चंचल असल्याने त्या चंचलपणामुळेच त्यांचे हे वेगवेगळे प्रगटीकरण हाेत असते.
 
जाणीव हा आत्म्याचा स्थायीभाव आहे.मात्र परब्रह्म पूर्णपणे निश्चल आहे. आत्म्याची ही विविध रूपे व त्याचे अगाध गुण पाहणे व त्याला आणि त्याहीपेक्षा त्याच्यामध्ये अंशरूपाने वसणाऱ्या परब्रह्माला ओळखणे हीच आत्म्याची खरी उपासना आहे. आत्म्यामध्ये असलेला राम पाहिला म्हणजे आत्मारामाची प्रचिती येईल. असे करत गेल्यानेच साधकाला निरंजन परब्रह्माची ओळख व नंतर प्राप्ती हाेऊन त्या परब्रह्माशी तद्रुपता प्राप्त हाेऊ शकेल.असे सांगून या समासाचा उपसंहार करताना श्रीसमर्थ म्हणतात, की या मार्गाने उपासना चालवीत गेल्यावर सर्व संदेह नाश पावतात. अनुमानाला जागाच न राहता स्वप्रचितीने सत्य ब्रह्म प्राप्त हाेते. सर्व साधकांनी म्हणूनच आत्म्यातून आत्मारामाकडे व तेथून परम ात्म्याकडे जाण्याचा मार्ग धरावा.
- प्रा. अरुण गाेडबाेले, माे. 9822016299