‘जेम्स अँड ज्वेलरी प्रदर्शनात’ विदेशी प्रतिनिधींसमाेर महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा जपत परकीय गुंतवणूक क्षमतेचे सादरीकरण

    14-May-2026
Total Views |
 

gem 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून राज्यात नव्याने स्थापन करण्यात आलेल्या ‘परकीय थेट गुंतवणूक, प्रवासी भारतीय व्यवहार आणि आंतरराष्ट्रीय संपर्क’ या विभागाच्या माध्यमातून बीकेसीत सुरू झालेल्या ‘जेम्स अँड ज्वेलरी प्रदर्शनात’ उपस्थित सुमारे 200 विदेशी प्रतिनिधींसमाेर राज्याचा सांस्कृतिक वारसा जपत परकीय गुंतवणूक क्षमतेचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले.
केंद्राच्या वाणिज्य आणि उद्याेग मंत्रालयाच्या माध्यमातून जेम्स अँड ज्वेलरी एक्स्पाेर्ट प्रमाेशन काैन्सिल (जीजेईपीसी) मार्फत जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे ‘किंबरली प्राेसेस इंटरसेशनल मीटिंग’मध्ये राज्याचे विशेष प्रदर्शन दालन उभारण्यात आले आहे. राज्यातील सांस्कृतिक, कृषी, हस्तकला आणि पारंपरिक उत्पादनांचे जागतिक प्रतिनिधींसमाेर सादरीकरण करून त्यांना आंतरराष्ट्रीय निर्यात आणि गुंतवणुकीशी जाेडणे हा या दालनाचा मुख्य उद्देश आहे.
 
परकीय थेट गुंतवणूक, प्रवासी भारतीय व्यवहार आणि आंतरराष्ट्रीय संपर्क विभागफ या सामान्य प्रशासन वभागांतर्गत नवीन उपविभागाची स्थापना करण्यात आली आहे. डाॅ. राजेश गवांदे या विभागाचे सचिव आहेत. देश पातळीवर अशा प्रकारे स्वतंत्र विभाग स्थापन करण्याची ही पहिलीच वेळ असून, राज्यात जास्तीत जास्त परकीय गुंतवणूक आणण्यासाठी व आंतरराष्ट्रीय स्तरावरील संबंध सुधारण्यासाठी हा विशेष प्रयत्न आहे.या प्रदर्शनात राज्यातील निर्यातक्षम आणि सांस्कृतिकदृष्ट्या वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांचे आकर्षक प्रदर्शन करण्यात येत आहे. काेकणातील भाैगाेलिक मानांकन प्राप्त हापूस, राज्यातील हातमाग उत्पादने, ग्रामीण महिला बचतगटांची उत्पादने, आदिवासी विकास विभागांतर्गत ‘शबरी‘ ब्रँडची उत्पादने, तसेच पारंपरिक हस्तकलांचा समावेश करण्यात आला आहे.आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींना राज्याची ओळख अधिक प्रभावीपणे व्हावी, यासाठी पारंपरिक महाराष्ट्रीयन वेशभूषेतील राज्य शासनाच्या प्रतिनिधींची नियु्नती प्रदर्शन दालनात करण्यात आली आहे.