3. सहकारी : व्यवसाय नाेकरीसाठी व्यक्ती आपल्या आवडीचे क्षेत्र निवडते. त्यामुळे तेथील सहकारीही त्याच विचारांचे, तीच आवड असणारे म्हणजे स्वाभाविकच त्याच्यासारखे असतात.गायनाच्या कार्यक्रमात मुख्य गायकाचे सहकारीदेखील गायकच असतात.
बाेध : भाग्यरेषा माणसाच्या हातावरच असतात आणि काम करणारेही हातच असतात! फळाची आशा न ठेवता प्रामाणिकपणे कर्तव्य समजून कर्म करणाऱ्याचे निश्चितच उच्चयन हाेते. त्यांच्या हातांवरील रेषांची दिशा (भाग्य) बदलते आणि जीवन सफल हाेते.