कंपन्यांसह वैय्नितकजीवनातही एआयचे स्थान वाढतेय

    14-May-2026
Total Views |

AI
 
एआय कंपॅनियन्स आता केवळ साधे चॅटबाॅट्स राहिलेले नाहीत, तर ते एका माेठ्या आर्थिक आणि सामाजिक परिसंस्थेमध्ये विकसित झाले आहेत.यामुळेच त्यांची बाजारपेठ वेगाने वाढत आहे.विविध अहवालानुसार, एआयची बाजारपेठ आज जवळपास 3.76 लाख काेटी रुपयांपेक्षा जास्त झाली आहे. पुढील दहा वर्षांत ती 46 लाख काेटी रुपयांपर्यंत पाेहाेचू शकते. फाॅर्च्युन बिझनेस इनसाइट्स आणि प्रेडेन्स रिसर्चनुसार, 2026 पर्यंत त्यांची बाजारपेठ अंदाजे 4,580 ते 4,665 अब्ज रुपयांच्या दरम्यान असेल, तर 2035 पर्यंत, ती 31 टक्के वार्षिक दराने वाढून तब्बल अंदाजे 51.80 लाख काेटी रुपयांपर्यंत पाेहाेचू शकते.
कंपन्यांमध्ये एआय बनतील सीईओ
 
कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) प्रत्येक क्षेत्रात वेगाने बदल घडवत आहे. एआयमुळे उत्पादकता किती वाढेल, किती नाेकऱ्या निर्माण हाेतील, कमी हाेतील यावर चर्चा हाेते.पण, ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी तर असे भाकीत केले की, पुढील काही वर्षांत एआयच्या अतिबुद्धिमान विकासामुळे कंपन्यांना सीईओंची गरजही भासणार नाही. केवळ कंपन्या, कारखान्यांमध्येच नाही, तर लाेकांच्या वैयक्तिक जीवनातही एआय महत्त्वपूर्ण जागा घेईल.
 
चर्चेतील प्रमुख एआय साेबती गेल्या काही वर्षांत, एआय साेबत्यांचा वेगाने प्रचार झाला आहे. हे डिजिटल साेबती भावनिक आधार देण्यासाठी, एकटेपणा कमी करण्यासाठी, काही प्रकरणांमध्ये, राेमँटिक-जिव्हाळ्याच्या नात्याचा आभास निर्माण करण्यासाठी तयार केले आहेत. चर्चेतील चार एआय पुढीलप्रमाणे :
 
रेप्लिका
हे विशेषतः भावनिक आधार देण्यासाठी तयार केले आहे. याला मित्र, मार्गदर्शक, जाेडीदार म्हणून निवडू शकता. कालांतराने, ते व्यक्तीच्या आवडीनिवडी, भावना, संवाद शैलीनुसार प्रतिसाद देते.
 
कॅरेक्टर.एआय इंटरनेटवरील लाखाे पुस्तके, लेख, संभाषणांमधील डेटावर त्याला प्रशिक्षित केले आहे. यामुळे ते एखाद्या पात्राप्रमाणे प्रतिसाद देऊ शकते. उदाहरणार्थ, जर एखाद्याने प्रसिद्ध व्यक्तीचे पात्र निवडले, तर त्याच्यासारखेच बाेलेल. त्यामुळे येथे, वापरकर्ता काेणत्याही व्यक्तिमत्त्वाशी संवाद साधू शकताे.गेटबाॅक्स यामध्ये एक ‘व्हर्च्युअल हाेम राेबाेट’च्या रूपामध्ये एक छाेटेसे हाेलाेग्राफिक पात्र, काचेच्या बरणीत दिसते. ते चॅटजीपीटी शी जाेडलेले आहे, जे वापरकर्त्याच्या भावना ओळखू शकते आणि संवाद साधू शकते. जे लाेक एकटे राहतात आणि घरी गेल्यावर काेणीतरी असावे, असे ज्यांना वाटते, त्यांच्यासाठी हे तयार केले आहे.
 
हार्माेनी एक वादग्रस्त मानवाकृती राेबाेट, याला जगातील पहिला ‘एआय-शक्तीवर चालणारा भाैतिक साेबती’ मानले जाते. याला आपल्या गरजेनुसार बदलता येते. हा एक स्पर्श करता येण्याजाेगा भाैतिक एआय साेबती आहे. तर गेटबाॅक्स हा बरणीत राहणारा एक डिजिटल साेबती आहे.