तरुणसागरजी

    13-May-2026
Total Views |
 

tarunsagarji 
 
श्रीकृष्णाच्या जीवनातील घटना म्हणजे ‘गीता’, तर श्रीरामाच्या जीवनातील घटना म्हणजे ‘रामायण’.आचार्य कुन्दकुन्द यांच्या जीवनातील घटना म्हणजे ‘समयसार’ आणि माझ्या जीवनातील घटना म्हणजे ‘कटू-प्रवचन’.ही कटू प्रवचनं इंजेक्शनचे काम करतात.इंजेक्शनच्या सुईचे टाेक लहान असते आणि त्यात औषधही थाेडेसेच असते; परंतु त्याचा हाेणारा परिणाम मात्र अचूक आणि याेग्य असताे. खरे तर कटू-प्रवचन हे काही पुस्तक नव्हे, तर जीवनाचे ‘मस्तक’ आहे.