अॅव्हरेजहून असत्य असं आणखी काहीही नाही. उदाहरणार्थ अहमदाबादमधल्या माणसांची सरासरी उंची किती? तर सर्व माणसांची उंची माेजून तिची बेरीज करावी, तीत लहान मुलांचा म्हाताऱ्यांचा, स्त्रियांचा, पुरुषांचा- सगळ्यांचा समावेश असेल. सगळ्यांच्या उंचीची बेरीज भागिले सगळयांची संख्या अशाने जी उंची मिळेल त्या उंचीचा एखादा माणूस अख्ख्या अहमदाबादमध्ये शाेधून मिळाला तर मिळाला. ही सरासरी उंची. त्या उंचीचा सरासरी माणूस हुडकण्याच्या फंदात चुकूनही पडू नका. ताे मिळायचा नाही कधीच. सगळे नियम सरासरीवर बसवलेले असतात.सरासरी फक्त कामचलाऊ असते, सत्य नाही. कुणाला पाच तास झाेपेची गरज असेल, काेणाला सहा तास, कुणाला सात तास. काेणी दुसरे माणूस त्याबद्दल ठरवू शकत नसते, की किती गरज आहे. आपले आपल्यालाच ठरवावे लागते.
प्रयाेगानेच ठरवावे लागते. अन् अवघड नाहीये. आपण प्रामाणिकपणे प्रयाेग केले तर किती झाेपेची गरज आहे ते आपणच ठरवाल. जेवढ्या झाेपेनंतर आपणाला पुन्हा झाेपेचा विचार शिवतही नसताे अन् जित्नया झाेपेनंतर आपणास आळस येत नाही तर ताजेपण येते, ताे आपला निद्रा-बिंदू समजायचा. संध्याकाळी सहाला झाेपायचे की आठला की बाराला अशी वेळ पण बांधता येत नसते. याबाबतीतही प्रत्येक व्यक्तीच्या शरीराच्या आंतरिक गरजा वेगवेगळ्या असतात.आणि त्या वेगवेगळ्या गरजांनुसार प्रत्येकाने आपल्याला काय लागू आहे ते पाहिले पाहिजे. पण आपली सगळी व्यवस्था अशी आहे की ती अव्यवस्थितता व्यवस्थितपणे रुजवते.आपली व्यवस्था काय आहे? सगळ्यांनी इत्नया वाजता जेवायला पाहिजे.