विकास म्हणजे केवळ सिमेंटच्या इमारती अथवा रस्ते नव्हेत, तर नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवून आणणे हाेय. श्रद्धा, संस्कृती, पर्यावरण, पर्यटन आणि राेजगार यांचा समताेल राखून विकास साधण्यास शासन प्राधान्य देत आहे.काेकणाचा विकास हा राज्याच्या प्रगतीचा भक्कम पाया असल्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी येथे सांगितले. राेहा शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना देणाऱ्या विविध विकासकामांचे भूमिपूजन करताना पवार बाेलत हाेत्या. खासदार सुनील तटकरे, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष मधुकर पाटील, जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा पाेलीस अधीक्षक आंचल दलाल, राेहा- अष्टमीच्या नगराध्यक्षा वनश्री शेडगे आदी मान्यवर यावेळी उपस्थित हाेते.