चाणक्यनीती

    13-May-2026
Total Views |
 

chanakya 
वाच्यार्थ : भविष्यात घडणाऱ्या घटनांचा क्रम अटळ असताे; भाग्यानुसारच माणसाला बुद्धी लाभते, त्याप्रमाणेच ताे चरितार्थासाठी व्यवसाय निवडताे व त्याला सहकारीदेखील त्याच्यासारखेच लाभतात.
 
भावार्थ : जन्मत:च व्यक्तीचे भाग्य ठरते.
 
. बुद्धी : व्यक्तीला त्याच्या पूर्वसंचितानुसार कुशाग्र, सामान्य अथवा अति सामान्य यातील काेणत्या तरी प्रकारची बुद्धी लाभते.
 
2. व्यवसाय : जशी बुद्धी तसा व्यवसाय/नाेकरी हे सूत्र आहे. व्यक्ती आपल्या जन्मानुसार, आवडीनुसार, क्षमतेनुसार, काैशल्यानुसार (सर्वसाधारणपणे) व्यवसाय निवडते. सेवाभावी व्यक्ती नर्स, वैद्य बनतात; धनप्रिय व्यक्ती व्यापार निवडतात, तर गणित (हिशेब) आवडणाऱ्या व्यक्ती अकाउंट्सशी संबंधित नाेकरी/व्यवसाय करतात. तर दुर्मती असणारे ‘नशिल्या’ पदार्थांचा व्यापार करतात.