या जहाजासाठी 913 काेटींचा खर्च आला, त्यात प्रवासासाठी प्रतिव्य्नती 51 लाख भाडे

    13-May-2026
Total Views |
 
 

boat 
रशियन अब्जाधीश ओलेग टिनकाेव्ह यांना तांबूस-तपकिरी (ब्राँझ) रंग इतका आवडताे की, त्यांनी आपल्या 253 फूट लांबीच्या ‘ला दाचा’ या सुपरल्नझरी जहाजाला तांबूस-तपकिरी आणि पांढऱ्या रंगाने नवीन लुक दिला आहे. 913 काेटी रुपयांचे हे जहाज एकदा सामान भरल्यानंतर, पुन्हा दुसऱ्यांदा सामान न भरता समुद्रावर 40 दिवसांपर्यंत राहू शकते. त्यावर दाेन हेलिकाॅप्टर लँड करण्याची सुविधा आहे. त्याशिवाय जिम आणि तुर्की हमाम (एक प्रकारचा बाथ) अशा सुविधाही आहेत. हे सुपर ल्नझरी जहाज भाड्याने उपलब्ध आहे. एक आठवड्यासाठी प्रति व्य्नती भाडे सुमारे 51 लाख रुपये आहे. या जहाजावर जास्तीत जास्त 12 पर्यटक राहू शकतात.