ऐतिहासिक वसई किल्ल्याचा 288 वा विजयाेत्सव माेठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विजयाेत्सवात मशाल यात्रा, नरवीर चिमाजी आप्पांच्या पुतळ्याचे पूजन, ढाेलताशा पथकांचे वादन, लेझीम पथकांचा नृत्याविष्कार यावेळी करण्यात आले. वसई विरार महापालिकेच्या क्रीडा व सांस्कृतिक विभाग, वसई तालुका कला-क्रीडा विकास मंडळ आणि वसई विजय स्मारक समितीच्या सहकार्याने हा 288 वा विजयाेत्सव साजरा करण्यात आला. वज्रेश्वरी मंदिरातून निघालेल्या मशाल यात्रेने या विजयाेत्सवाला प्रारंभ झाला हाेता. पारनाक्यापासून ढाेल-ताशा पथक, लेझीम पथकांच्या जल्लाेषपूर्ण गजरात मशाल यात्रा वसई किल्ल्यापर्यंत गेली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते नरवीर चिमाजी अप्पा स्मारक पूजन व नरवीर चिमाजी अप्पांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. महापाैर अजीव पाटील, उपमहापाैर मार्शल लाेपीस, माजी महापाैर नारायण मानकर, स्थायी समिती सभापती प्रवीण शेट्टी, विराेधी पक्षनेते मनाेज पाटील, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांच्यासह दुर्गप्रेमीं व नागरिक माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.