रेडइटवर ‘आस्क मी एनीथिंग’ मालिकेत लाेकांनी त्यांना निरनिराळ्या विषयांवर प्रश्न विचारले हाेते.क्रिएटिव्ह लीडर काेच रेमी ब्ल्यूमॅनेल्ड यांनी गेट्स यांच्या प्रश्नाेत्तरांचा विस्तार करीत आनंद शाेधण्याचा प्रयत्न केला.गेट्स यांच्या त्तरांद्वारे ते सांगत आहेत की, काेणत्या छाेट्या छाेट्या गाेष्टींची काळजी घ्यावी. जीवनात प्राथमिकता ठरवणे, नियमित व्यायाम करणे आणि स्वत:शी बाेलणे आपल्याला आनंदी ठेवत असते.
1. वीस वर्षे माेठे हाेऊन बाेलावे : अडचणींतून मार्ग काढण्यासाठी आपल्या वयापेक्षा 20 वर्षे माेठे जाणवून बाेलावे. स्वत:ला भविष्यात ठेवल्यामुळे मार्ग सापडतातआणि तेव्हा कळते की, खरा आनंद छाेट्या-माेठ्या गाेष्टींमध्ये गुंतून राहण्यात नाही.
2. शब्द पाळा : वेळेवर दिलेला शब्द पाळल्यामुळे मिळणारे समाधान इतर काेणत्याही गाेष्टींमधून मिळत नसते. गेट्स याला हेतूपुरस्सर गाेष्टी हाेणे व आपल्या शब्दांवर कायम राहणे म्हणतात. ज्या जीवनात स्वत:वर विश्वास नसेल त्या जीवनात काय आनंद असणार आहे.
3. व्यायाम करा : ही गाेष्ट सिद्ध झाली आहे की, व्यायाम सेराेटाेनिनचे प्रमाण वाढवून मूड व्यवस्थित करताे. झाेप उत्तम लागते, भूक लागते.व्यायामामुळे आपण एकाग्रतेने काम करू शकता. यामुळे एक यशाची भावना जाणवते.
4. वेळ द्या : आपल्या माणसांना पुरेसा वेळ द्या.जेव्हा स्वत::विषयी शारीरिक आणि भावनिक रुपात उत्तम जाणीव हाेईल.विश्वास वाटेल, तेव्हा आपल्या माणसांना प्राधान्य द्याल तर आपले जीवन एखाद्या अनिफट, स्वार्थी आणि एकाकी अरबपतीपेक्षा कितीतरी चांगले असेल.