हे आजमावून बघा...

    12-May-2026
Total Views |
 
 

sleep 
चांगल्या आराेग्यासाठी चांगली झाेप येणं खूप आवश्यक आहे.त्यासाठी उजव्या कुशीवर झाेपणे उत्तम.
 
 उजव्या बाजूस झाेपण्याने हृदयावर जास्त ताण पडत नाही.तसंच हृदय अधिक चांगल्या प्रकारे काम करते.
 अशाप्रकारे झाेपण्याने शरीराचे वेगवेगळे अवयव आणि मेंदूपर्यंत रक्ताबराेबरच ऑक्सिजनचा प्रवाह याेग्य प्रकारे हाेताे. सगळे अवयव व्यवस्थित काम करतात.
 गर्भवती महिलांसाठी उजव्या कुशीवर झाेपणे उत्तम. यामुळे गर्भस्थ बाळाच्या आराेग्यावर वाईट परिणाम हाेत नाही.त्याचबराेबर टाचा, हात आणि पायांना सूज अशा समस्या निर्माण हाेत नाहीत.
 उजव्या कुशीवर झाेपण्याने थकवा जाणवत नाही आणि पाेटाशी संबंधित समस्याही हाेत नाहीत.
 अशाप्रकारे झाेपण्याने अन्न व्यवस्थित पचतं. पित्त किंवा छातीत जळजळणे यांसारख्या समस्याही हाेत नाहीत.