वर्धा ते सिंधुदुर्ग (पत्रादेवी) दरम्यान प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गासाठी राज्य शासनाने सुधारित अधिसूचना जारी केली असून, काेल्हापूर जिल्ह्यातील 8 तालुक्यांतील 78 गावांचा या महामार्गात समावेश करण्यात आला आहे. यामध्ये करवीर, पन्हाळा, हातकणंगले, राधानगरी, कागल, भुदरगड, आजरा आणि चंदगड तालुक्यातील गावांचा समावेश आहे.राजपत्रात प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेनुसार महामार्गाचे नवीन संरेखन (अलायमेंट) निश्चित करण्यात आले आहे.या अधिसूचनेनुसार हा प्रस्तावित ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस वे सुमारे 802.6 कि.मी.चा असून, राज्यातील 12 जिल्ह्यांना जाेडणार आहे. हा महामार्ग नागपूर ते गाेवा दरम्यान उभारण्यात येणार आहे. काेल्हापूर जिल्ह्यातील करवीर,राधानगरी, गगनबावडा, कागल, भुदरगड, आजरा आणि चंदगड या तालुक्यांतील 78 गावांमधून महामार्गाचे संरेखन करण्यात आले आहे. या महामार्गासाठी सुपीक शेती, वनक्षेत्र, तसेच काही ऐतिहासिक व पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील भाग बाधित हाेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या प्रकल्पाला काही भागांतून विराेधही सुरू आहे. राजपत्रातील माहितीनुसार, पूर्वीच्या अधिसूचनेतील काही गावांच्या सीमांमध्ये आणि संरेखनात बदल करण्यात आले असून, त्यानुसार नवीन यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.