अंत:करण, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या सर्वांनी मिळून अपूर्व असे अंत:करणपंचक बनते; पण तेही आत्म्याच्याच अंशरूपाने असते. सत्व, रज आणि तम हे त्रिगुणसुद्धा आत्म्याचेच असतात. आत्म्याच्या प्रभावाम ुळेच अनेक तऱ्हेचे विचारप्रवाह मनामध्ये निर्माण हाेतात आणि धैर्य आणि धाडसाच्या, शाैर्य आणि वीरतेच्या असंख्य कृतीमागेही आत्माच उभा असताे. भक्तीचे नऊ मार्ग शास्त्राने सांगितले आहेत पण जीव जेव्हा त्यातील काेणताही मार्ग अनुसरताे तेव्हा त्यामागील प्रेरणा आत्म्याची असते. त्या याेगाने प्राप्त हाेणारी अलिप्त वृत्ती, सहजस्थिती आणि चारही प्रकारच्या मुक्ती यांचाही भाेक्ता आत्म ाच असताे.
पाहणे, ध्यान करणे आणि ज्ञान हाेणे या तिन्ही ज्ञानक्रियांचा संदर्भ श्रीसमर्थांनी ार सुरेख पद्धतीने दिला आहे. या तिन्हीमध्ये प्रत्येकात तीन गाेष्टी आवश्यक असतात. पाहण्यामध्ये पाहणारा द्रष्टा जे पहावयाचे ते दृश्य आणि जे साफल्य येते ते दर्शन, ध्यानामध्येही ध्यान करणारा ध्याता, ज्याचे ध्यान करताे ते ध्येय आणि फलस्वरूप हाेणारे ध्यान.ज्ञानार्जनामध्येही ज्ञानप्राप्तीची जिज्ञासा धरणारा ज्ञाता, ज्याचे ज्ञान हवे आहे ते ज्ञेय व हाेणारे ज्ञान, या तिन्ही प्रकारांतीत प्रत्येकातील तिन्ही गाेष्टी हा आत्म्याचाच विलास आहे हे सत्य जाणले पाहिजे.द्रष्टा, साक्षी, ज्ञानघन आणि सत्ता, चैतन्य, पुरातन तसेच श्रवण मनन आणि विवरण या सर्वांमध्येही कर्ता करविता आत्माच असताे आणि म्हणूनच हे सर्व एका आत्म्याचेच गुण आहेत. आत्म्याचे गुण आणि त्यातून प्रतीत हाेणारे त्याचे अनेकपदी प्रगटीकरण विषद करताना श्रीसमर्थही त्यामध्ये कविमनाने रंगून गेलेले सहजपणे प्रत्ययास येते.
- प्रा. अरुण गाेडबाेले, माे. 9822016299