गेल्या महिन्यात रामनवमी साजरी झाली. यादरम्यान, श्रीरामाचे खरे बालरूप अयाेध्येच्या रस्त्यांवर फिरत असल्याचा एक व्हिडिओ साेशल मीडियावर व्हायरल हाेत आहे. राम मंदिरात असलेल्या रामलल्लाच्या मूर्तीप्रमाणेच काळ्या पाषाणाचे रूप धारण केलेले बालराम, पीतांबर आणि पारंपरिक दागिन्यांनी सजून अयाेध्येत फिरत हाेते. बालरामाच्या चेहऱ्यावरील निरागसता देखील रामलल्लाच्या मूर्तीशी मिळतीजुळती हाेती. मात्र, या बालरामासाेबत त्यांची आईसुद्धा भगव्या वस्त्रात दिसली. साेशल मीडियावर या रामलल्लाला पाहून लाेक धन्य झाले. अयाेध्येतील राम मंदिरात विराजमान असलेले रामलल्ला रस्त्यांवर भक्तांना दर्शन देण्यासाठी बाहेर आलेले पाहून लाेकांना आश्चर्य वाटले.