गरीब-श्रीमंत, जात-धर्म न पाहता पाेस्ट विभागाची सेवा देशाच्या कानाकाेपऱ्यापर्यंत पाेहाेचलेली आहे.कारगिल युद्धाच्या काळातही वीर जवानांचे संदेश त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पाेहाेचवणारे पाेस्टमन हे मानवी संवेदनांचे वाहक ठरले. पाेस्ट विभाग हा केवळ सेवा देणारा विभाग नसून, भारतीय सांस्कृतिक व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.मुख्यमंत्री, तसेच दळणवळण आणि ईशान्य क्षेत्र विकास मंत्री ज्याेतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते अंधेरी रेल्वे स्थानक परिसरातील नूतनीकरण करण्यात आलेल्या अत्याधुनिक पाेस्ट ऑफिसचे लाेकार्पण करण्यात आले.यावेळी आमदार अमित साटम, आमदार हारून खान, महाराष्ट्र-गाेवा सर्कलचे मुख्य पाेस्टमास्तर जनरल अमिताभ सिंह, तसेच पाेस्टमास्तर जनरल के. अराेरा आदी उपस्थित हाेते.
पाेस्ट विभागाने महसुलातील वाढीचा दर अडीच टक्क्यांवरून यंदा 16 टक्क्यांपर्यंत नेला असून नव्या स्वरूपात जनतेच्या सेवेत दाखल हाेताना अनेक नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. राज्यात ‘जनसेवा कनेक्ट’च्या माध्यमातून 2200 पाेस्ट ऑफिस सुरू करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.देशातील दीड लाख कार्यालयांमार्फत सेवा देताना पाेस्ट विभागाने सर्वसामान्यांच्या सेवेला अग्रक्रम दिला आहे. पाेस्ट लाईफ इन्शुरन्समध्ये दीड काेटी खाती आणि जवळपास दाेन लाख काेटींच्या ठेवी जमा झाल्या असून, पाेस्ट बँकेत 40 काेटी खाती उघडण्यात आली आहेत, असे शिंदे यांनी सांगितले. अंधेरी आर. एस. पाेस्ट ऑफिस लाेकार्पणानंतर मान्यवरांच्या हस्ते स्मृतिफलक अनावरण आले. तसेच, आधार सेवा केंद्राची त्यांनी पाहणी केली. त्यानंतर विशेष दृकश्राव्य सादरीकरण, तसेच ‘जन सेवा कनेक्ट’ उपक्रमावरील विशेष पाेस्टल कव्हरचे प्रकाशन करण्यात आले.